विजयबापू शिवतारेंचे कॅबिनेट मंत्रिपद थांबणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

विजयबापू शिवतारेंचे कॅबिनेट मंत्रिपद थांबणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सासवड ः गुंजवणी धरण व पाइपलाइन प्रकल्पासाठी अनेक अडथळे पार करीत विजयबापु शिवतारे राबले. हे काम झाले तर, बापू पुढील कित्येक वर्षे हटणार नाही, म्हणून इथल्या काही मंडळींनी कोर्टबाजीत वेळ घालवला. न्यायदेवतेने त्यांचे दावे फेटाळल्याने आता गुंजवणीचे पाणी कोणीही रोखू शकत नाही आणि विजयबापूंचे कॅबिनेट मंत्रिपदही थांबणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सासवड येथे दिली.

पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी सासवड (ता. पुरंदर) येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ करणारच पण ते करताना शेतकऱ्यांचे पूर्ण समाधानही करणार असेही ते म्हणाले.

माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश करीत शिवतारेंना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी शिवतारे यांच्यासह बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, शंकरनाना हरपळे, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष पंडितदादा मोडक, पुरंदर तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, गंगाराम जगदाळे, श्रीकांत राऊत, सेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव, संदीप मोडक, कैलास ढोरे, संगीताराजे निंबाळकर, गिरीश जगताप, धनंजय कामठे, केशव कामठे, रवींद्र फुले, प्रकाश खेडेकर, युवासेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सचिन भोंगळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ""एकीकडे विजयबापू मोठी धडपड करून गुंजवणीचे पाणी आणत ओत. तर दुसरीकडे इथले काहीजण जाणीवपूर्वक अडवणूक करत आहेत. पण आता हे पाणी कोणीच रोखू शकत नाही. पुरंदर तालुक्‍याच्या इतिहासात कधीच झाली नव्हती, एवढी कामे विजय शिवतारेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात झाली. येणाऱ्या काळात पुरंदर अजून समृद्ध होणार आहे.''

"पप्पू .. चक्कू'वर शिवतारे बरसले
"मी पप्पू आहे, पण चक्कू चालवेल त्यावेळेस संजय जगताप काय आहे, ते कळेल', असे वक्तव्य संजय जगताप यांनी शिवरी येथील सभेत केल्याचा संदर्भ देत शिवतारे म्हणाले, ""पुरंदरची जनता 21 तारखेला या दादागिरीला उत्तर देईल. गुंजवणीच्या पाण्याशी आणि पुरंदरच्या मातीशी ज्याने गद्दारी केली, त्याचा नायनाट इथली जनताच करेल.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com