त्यासाठी मी स्वतः मंत्रालयात प्रत्येक विभागात किमान १० चकरा मारल्या : सावे

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६८० कोटी रुपयाच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला आज मंजुरी मिळाली.
Atul_Save
Atul_Save

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि तितकाच महत्त्वाचा असलेला पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी माझी मनोमन इच्छा होती. मी मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला गेलो.

त्याचवेळी शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही मनावर घेतले आणि अवघ्या ५५ दिवसात १६८० कोटी रुपयांच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. 

ही योजना पूर्णत्वास यावी म्हणून मी स्वतः प्रत्येक विभागात किमान १० वेळा तरी जाऊन आलो. आज त्याचं खूप समाधान वाटतंय. शहराचा पाणी प्रश्न सुटतोय, यापेक्षा माझ्या आयुष्यातला आनंद काय मोठा असू शकतो, अशी प्रतिक्रिया उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

 औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६८० कोटी रुपयाच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला आज मंजुरी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालावर आज मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली.

त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना योजनेसाठी कसा पाठपुरावा केला हे सांगितले.

मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी मान्यही केली. पण इतक्या लवकर होईल असं मलाही वाटलं नव्हतं. पण आज तो सुखद धक्का मिळाला. यातून लवकरच शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवू, असंही ते म्हणाले.

थोड्याच दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेत न अडकता या योजनेच्या प्रक्रियेला तातडीने सुरुवात होणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार, असे सावे म्हणाले. 

या योजनेमुळे अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरात भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. या योजनेचा सर्व खर्च राज्य शासन उचलणार आहे. यातून पैठणच्या जायकवाडी धरणातून औरंगाबाद शहरापर्यंत पाईपलाईन टाकणे, शहरात नव्या  पाईपलाईन टाकणे, नव्या ५२ पाण्याच्या टाक्या उभारणे ही कामं करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com