फडणवीस- शेट्टींत "वर्षा'वर गुप्त बैठक ! 

मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीसंदर्भात शेट्टींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी "सरकारनामा'ने अनेकवेळा संपर्क साधला. शेट्टींचे सहकारी आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शेट्टीसाहेब दिल्लीतून असून ते "लाईव्ह'मध्ये असल्याचे सांगितले. बोलणे करुन देतो, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात संपर्क झाला नाही. रविवारी पुन्हा संपर्क केल्यावर शेट्टीसाहेब कार्यक्रमात आहेत, असे त्यांच्या पीएकडून सांगण्यात आले.
 फडणवीस- शेट्टींत "वर्षा'वर गुप्त बैठक !
फडणवीस- शेट्टींत "वर्षा'वर गुप्त बैठक !

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यात बुधवारी मध्यरात्री "वर्षा' निवासस्थानी सुमारे चार तास वाटाघाटी झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी संप चिघळल्यानंतर फडणवीस यांनी शेट्टी यांच्याबाबतीत संवादाचे धोरण अवलंबले आहे. त्याचाच भाग म्हणून ही भेट झाली असून यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते, असे समजते. 

गेले महिनाभर भाजप सरकारचे विविध घटक आणि शेट्टी यांच्यातीला संघर्ष वाढला होता. शेट्टींचे सहकारी आणि फडणवीस सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीत्व करत असलेले सदाभाऊ खोत हे संघर्षाच्या केंद्रस्थानी होते. गेल्या दोन महिन्यांपासून शेट्टी आणि खोत यांच्यात फूट पडेल, यादृष्टीने राजकीय चाली सुरु होत्या. खोतांना फडणवीसांनी अतिरिक्‍त खाते दिले, त्यासरशी संघटनात्मकदृष्ट्याही खोत फडणवीसांना नेते मानू लागले. यातूनच शेट्टी आणि भाजप सरकारमध्ये संघर्ष सुरु झाला. शेट्टींनी पुणे ते मुंबई अशी आत्मक्‍लेश यात्रा काढली. त्या यात्रेची साधी चौकशीही सरकारने केली नाही. हजारो कार्यकर्ते रस्त्यावरुन चालत असताना त्यांना ऍम्बुलन्सची व्यवस्था देण्यात आली नव्हती.

यात्रेच्या समारोपानंतर तीन दिवसातच पुणतांब्यातील शेतकरी संप संपविण्यावरुन स्वत: मुख्यमंत्री फडवणीस, राज्यमंत्री खोत यांच्यासह बैठकीतील सहभागी नेत्यांविरोधात वादळ उठले. पुढे आंदोलनाची सुत्रे नाशिकला गेली. तिथे सामूहिक नेतृत्वाची भूमिका स्विकारली गेलीतरी मुख्य नेते राजू शेट्टी राहिले. या आंदोलनाला दिशा देताना शेट्टींनी भाजप सरकारबरोबरच फडणवीसांना मुख्यत्वे टार्गेट केले होते. नाशिकच्या सुकाणू समितीने पुकारलेले आंदोलन होण्यापुर्वीच फडणवीसांनी उच्च अधिकार मंत्री समिती नेमली आणि कर्जमाफीचा तोडगा निघाला. हे झालेतरी फडणवीस आणि शेट्टींमध्ये तणाव कायम होता. 

सुकाणू समितीबरोबरच्या चर्चेत मुख्यमंत्री कुठेही नव्हते. तत्पुर्वी झालेल्या मुलाखतींत मुख्यमंत्र्यांनी "शेट्टींना माझ्याशी चर्चा करायची नाही' असे म्हटले होते. तर "माकडांशी चर्चा करा पण कर्जमाफी द्या' असे वक्‍तव्य शेट्टींनी केले होते. "शेतकरी कोण' या मुद्यावरुन दोघांत टीकटिप्पण्णी झाली होती. शेतकरी नेत्यांची दुकानदारी सुरु असल्याची वक्‍तव्ये भाजपचे मंत्री, प्रवक्‍ते करत होते. मात्र शेतकरी आंदोलनाचा वणवा समोर दिसत असल्याने आणि अमित शहा यांचा दौरा उंबरठ्यावर आल्याने सरकारने आपले पुर्वीचे धोरण बदलत संवाद वाढवला.

मंत्रीसमितीने यशस्वी बोलणी केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेट्टींसोबत संवाद वाढविण्याला प्राधान्य दिले. तसे चार पाच वेळा संदेशीही पाठवले. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री शेट्टी 12 च्या सुमारास वर्षा बंगल्यावर गेले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन त्यांच्यासोबत होते. चार वाजेपर्यंत त्यांच्यात खलबते झाली. कर्जमाफी, शेतकरी आंदोलनावर त्यांच्यात चर्चा केली. सदाभाऊ खोत यांना अधिकचे बळ देऊन संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल शेट्टींनी नापसंती व्यक्‍त केल्याचे समजते. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी अमित शहांबरोबरच्या बैठकीचे निमंत्रण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेट्टींना दिले. मात्र दिल्लीतील शेतकरी बैठकीमुळे ते आले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com