इच्छुकाची लायकी काढणारा शहर पातळीवरचा "तो' नेता कोण?, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

इच्छुकाची लायकी काढणारा शहर पातळीवरचा "तो' नेता कोण?, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्या एका इच्छुक उमेदवाराची लायकी काढण्यात आल्याने पक्षाचा शहर उपाध्यक्ष असलेला हा पदाधिकारी कमालीचा संतापला आहे. या प्रकाराचा निषेध करत या पदाधिकाऱ्याने शहर पातळीवरील संबंधित नेत्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिक्षण मंत्री अशिष शेलार यांच्याकडे केली आहे. 

योगेश राजापूरकर असे या इच्छुकाचे नाव आहे. ते कोथरूडमधून इच्छुक आहेत. राजापूरकर हे गेल्या पंधरा वर्षापासून पक्षाचे काम करीत आहेत. राजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री अशिष शेलार पुण्यात आले होते. यावेळी या नेत्याने राजापूरकर यांच्याविषयी वरील टिपणी केली. 

लायकी काढणारे पक्षाचे नेते शहर पातळीवरील आहेत. या नेत्याचे नाव सांगायला त्यांनी नकार दिला. नाव सांगायला हरकत नाही. मात्र, मी पक्षशिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. नाव सांगितले तर या नेत्याचे राजकीय करिअर धोक्‍यात येऊ शकते, असे राजापूरकर यांनी स्पष्ट केले. हा सारा प्रकार राजापूरकर यांनी त्याच ठिकाणी मंत्री शेलार यांच्या कानावर घातला. मुख्यमंत्री फडणवीस यांनादेखील या प्रकाराची माहिती देणारा "एसएमएस' पाठविण्यात आल्याचे राजापूरकर यांनी सांगितले. 

या संदर्भात राजापूरकर यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "" कोथरूडमधून 14 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यापैकी मी एक होतो. मात्र, मलाच या प्रकारची भाषा या नेत्याकडून वापरण्यात आली. मी गेली 15 वर्षे पक्षाचे काम निष्ठेने करतो आहे. पक्षाचा शहर उपाध्यक्ष आहे, असे असताना निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे लायकी आहे का असा शब्दप्रयोग करणे कितपत योग्य आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com