cm and nagar problem | Sarkarnama

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नगर : भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या शर्मिला येवले यांनी शाईफेक केली. आमदार असताना वैभव पिचड यांनी तालुक्‍यात कोणतीही ठोस कामे केली नसल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देऊ नये, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. 

महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज अकोले येथून झाली. दुपारी मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर ते अकोले शहरातून जात असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्या येवले यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करून ताफ्यावर शाईफेक केली. वैभव पिचड यांच्या उमेदवारीला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांविरोधातील भूमिका असे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही शाईफेक झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख