CM and Gadkary Associatied with Rafel Scam Alleges Priyanka Chaturvedi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'राफेल' घोटाळ्याला गडकरी, फडणवीसांचाही हातभार असल्याचा काँग्रेस प्रवक्त्यांचा आरोप

संपत देवगिरे 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

तप्रधान मोदींनी 'राफेल' व्यवहारात अनिल अंबानीच्या मित्रप्रेमापोटी देशाची संरक्षण सिध्दता संकटात आणुन सर्वात मोठा भ्रष्टाचार करीत आहेत. हे सर्व गोपनीय असल्याचा दावा करुन सर्व माहिती ते लपवतात. मात्र केंद्रीय मंत्री गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस नागपुरला डिफेन्स हब अंतर्गत रिलायन्स प्रकल्पाची पाहणी करतात. त्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे त्यांचाही या गैरव्यवहारात, तो झाकण्यात व जनतेपासुन खरी माहिती लपविण्यात हातभार आहे हे स्पष्ट होते - प्रियांका चतुर्वेदी

नाशिक : ''राफेल विमान खरेदी व्यवहार गोपनीय आहे असे सांगत देशाचे प्रचारमंत्री नरेंद्र मोदी त्याची माहिती देशापासून दडवतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच खरेदीशी संबंधीत रिलायन्स डिफेन्स प्रकल्पाची नागपुरला पाहणी करतात. एकप्रकारे ते राफेल घोटाळ्याला हातभार लावत आहेत. ते देशातील एचएएल प्रकल्प व त्यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या भवितव्य संकटात टाकत आहेत," असा आरोप अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. 

त्या म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींनी 'राफेल' व्यवहारात अनिल अंबानीच्या मित्रप्रेमापोटी देशाची संरक्षण सिध्दता संकटात आणुन सर्वात मोठा भ्रष्टाचार करीत आहेत. हे सर्व गोपनीय असल्याचा दावा करुन सर्व माहिती ते लपवतात. मात्र केंद्रीय मंत्री गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस नागपुरला डिफेन्स हब अंतर्गत रिलायन्स प्रकल्पाची पाहणी करतात. त्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे त्यांचाही या गैरव्यवहारात, तो झाकण्यात व जनतेपासुन खरी माहिती लपविण्यात हातभार आहे हे स्पष्ट होते." 

''भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारने राफेल विमान खरेदी घोटाळा केला. तो गोपनीय असल्याची खोटी माहिती संसद, माध्यमे व जनतेला दिली. यामध्ये 560 कोटींचे लढाऊ विमान 1670 कोटी रुपयांना खरेदी केले. विमानांची संख्या 126 वरुन छत्तीस केली. पंचेचाळीस हजार कोटींच्या तोट्यात असलेल्या आपल्या उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना थेट चाळीस हजार कोटींचा लाभ पोहोचविला आहे. यात अनुभवहीन रिलायन्स डिफेन्सला काम सोपवुन देशाच्या संरक्षण सिध्दतेला संकटात टाकले आहे. जनता व करदात्यांचे पैसे खासगी उद्योगपतीला दिल्याने देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला," असा आरोपही चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत केला. 

यावेळी त्या म्हणाल्या, "विमानाची खरेदी किंमत गोपनीय नाही. यापूर्वीच्या विविध करारांची किंमत संयुक्त आघाडी सरकारने संसदेत दिली आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी ही माहिती संसदेत दिली आहे. रिलायन्सच्य वार्षिक अहवालात त्याची माहिती उघड करण्यात आली आहे. राफेल कंपनीच्या अहवालात या कराराचा तपशील जाहिर केलेला आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन कोणाच्या फायद्यासाठी ही माहिती लपवत आहेत? याचे उत्तर देशाला द्यावे. त्यासाठी माध्यमे, जनतेत, न्यायालय आणि संसदीय समिती या सर्व स्तरावर काँग्रेस लढा देईल. देशहितासाठी काँग्रेस आपली प्रतिष्ठा पणाला लाऊन मोंदीचा हा भर्ष्टाचार उघड करील असे त्यांनी सांगीतले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख