मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर अकोल्यातील शेतकरी नेत्यांना केले स्थानबद्ध  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.6) अकोला दौऱ्यावर येत असून, या पार्श्वभूमिवर मंगळवारी सकाळी 11 वाजताच, येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना त्यांच्या घरुन पोलिसांनी ताब्यात घेतले व रामदासपेठ पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.
मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर अकोल्यातील शेतकरी नेत्यांना केले स्थानबद्ध  

अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.6) अकोला दौऱ्यावर येत असून, या पार्श्वभूमिवर मंगळवारी सकाळी 11 वाजताच, येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना त्यांच्या घरुन पोलिसांनी ताब्यात घेतले व रामदासपेठ पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री मंगळवारी अकोल्यात येणार असून, विविध ठिकाणी जाहीर सभाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यांचे दौऱ्याच्या एक दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी (ता.5), राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने बाळापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

या घटनेसंदर्भात व शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचे नियोजन करीत असताना, रामदासपेठ पोलिसांनी शेतकरी जागर मंचचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना त्याच्या घरातून सकाळी 11 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कलम 149 अन्वये नोटीस देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. ही प्रक्रिया नियमित असून कुठलाही धाक दडपण व जोरजबरदस्ती केली जात नाही.
- मुकुंद ठाकरे, पोलिस निरीक्षक रामदास पेठ, अकोला.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com