युती निश्‍चीत? मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच आघाडीच्या आमदारांचा शिवसेना प्रवेश

फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतच प्रवेश घेण्याचा सल्ला दिल्याचे सुत्रांनी सांगितले. यावरून शिवसेना भाजप युती निश्‍चीत होणार असल्याचे सुत्रांचे मत आहे.
Devendra -Uddhav alliance
Devendra -Uddhav alliance

मुंबई : सत्तेत राहून शिवसेना सरकारवर तिखट शब्दात प्रहार करत असली तरी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच आघाडीच्या आमदारांचा शिवसेना प्रवेश  झालेला असल्याने शिवसेना भाजप युती होण्याचीच चिन्हे दिसत आहेत .

कॉंग्रेस व राष्ट्रवादीतल्या ज्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या सर्वांनी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याची माहीती आहे. 

आगामी विधानसभा निवडणूकांत शिवसेना भाजप युती कायम राहणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यानी उध्दव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे, कॉंग्रेस राष्ट्रवादीतून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री मतदारसंघ पाहून निर्णय घेत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीचे आमदार पाडुरंग बरोरा, संदिप नाईक, सचिन अहिर, रश्‍मी बागल तर कॉंग्रेस मधून आमदार निर्मला गावित या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचेच आमदार दिलीप सोपल हे गुरूवार (ता.29) ला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  या सर्वच नेत्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची ईच्छा होती. 

त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली. मात्र, फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतच प्रवेश घेण्याचा सल्ला दिल्याचे सुत्रांनी सांगितले. यावरून शिवसेना भाजप युती निश्‍चीत होणार असल्याचे सुत्रांचे मत आहे.

सध्या मुख्यमंत्री व उध्दव ठाकरे यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असून जागावाटपाचे सुत्र लवकरच जाहीर होईल असा दावा केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला युती बाबत डिवचले असले तरी उध्दव ठाकरे यांनी त्यावर तिखट प्रतिक्रीया दिली नाही. 

मुख्यमंत्री व अमित शहा यांच्यासोबतच युतीच्या जागावाटपाचे सुत्र निश्‍चीत होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे, लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान शिवसेने सोबत युती करताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेसाठीच्या युतीची देखील बोलणी करत ठाकरे यांना विश्‍वास दिल्याचे सांगितले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com