विजय शिवतारेंसाठी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी सभा : गुंजवणी आणि विमानतळाचे काय बोलणार?

विजय शिवतारेंसाठी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी सभा : गुंजवणी आणि विमानतळाचे काय बोलणार?

सासवड :  पुरंदर - हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री विजय शिवतारे  यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी ता. 15 दुपारी एक वाजता सासवडला येणार आहेत. 

सासवडच्या पालखीतळ मैदानावर ही सभा संपन्न होणार  आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील सर्वात कळीचा मुद्दा असलेल्या गुंजवणी आणि विमानतळ प्रकल्पाबाबत ते काय बोलतात; याचे कुतूहल आहे. 

याबाबत बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव म्हणाले., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांचा पुरंदर हवेलीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. तालुक्याला गुंजवणी धरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय कृषी बाजार, राष्ट्रीय महामार्ग, पुरंदर उपसा आणि जनाईचे अवघ्या १९ टक्के रक्कमेत मिळणारे पाणी या राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कल्पनेतील विकासकामांना मूर्त स्वरूप आणण्यात या दोघांचे योगदान उल्लेखनीय आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसोबतच पुण्याचे खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही श्री. यादव म्हणाले.

राज्यात भाजप शिवसेना व महायुतीचेच सरकार येणार हे निश्चित असल्यामुळे श्री. शिवतारे यांच्या माध्यमातून पुरंदरला आणखी मोठा निधी मिळावा आणि सध्याचे मोठे प्रकल्प मार्गी लागावेत, अशी अपेक्षा आहे. जेजुरी शहराच्या संपूर्ण विकासासाठी श्री. शिवतारे यांच्या माध्यमातून २५० कोटींचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडेही लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com