मुख्यमंत्र्यांचा पहिला `हल्ला बोल` यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात

मुख्यमंत्र्यांचा पहिला `हल्ला बोल` यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने "महाजनादेश' यात्रेचे आयोजन केले आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा पार पडणार आहे. या यात्रेची सुरवात संत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या मोझरी (जि. अमरावती) येथून होणार आहे.

काॅंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पहिला हल्लाबोल करणार आहेत. विदर्भ आता भाजपचा बालेकिल्ला झाला असल्याने येथूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. विदर्भातून गेल्या विधानसभा निवडणुकीत 62 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या दहापैकी नऊ जागा या शिवसेना-भाजप युतीकडे आहेत. त्यामुळे येथूनच आपली मतपेढी आणखी भक्कम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहेत.

तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर 2009 आणि 2014 या दोन निवडणुकांत सलग निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील भाजपच्या लाटेत त्यांनी भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा वीस हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा प्रारंभ झालेल्या मतदारसंघात भाजपला आगामी निवडणुकीत यश मिळणार का, याची उत्सुकता राहणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जोरदार कार्यक्रम आखला आहे. विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी महिनाभर मुख्यमंत्र्यांची राज्यभर महाजनादेश यात्रा निघणार आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपची महाजनादेश यात्रा निघणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा रोडमॅप 

- महाजनादेश यात्रा : 30 जिल्हे,25 दिवस, 4 हजार 232 किलोमीटर अंतर,152 विधानसभा क्षेत्र, 104 जाहीर सभा, 228 स्वागत सभा आणि 20 पत्रकार परिषदा 

25 जुलै ते 10 ऑगस्ट 2019 - जिल्हयासह शक्ती केंद्र प्रमुख बैठक 
9 ऑगस्ट 2019 - सदस्यता अभियान ड्राइव्ह 
1 जुलै ते 15 ऑगस्ट - नवमतदार नोंदणी अभियान (युवा मोर्चा) 
15 जुलै ते 15 ऑगस्ट - पक्ष विस्तार योजना (सर्व शक्ती केंद्रांपर्यंत) 
10 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट - विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन 
1 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट - शक्ती सन्मान महोत्सव (रक्षाबंधन पर्व) (बुथस्तरावर व मंडल स्तरावर राखी संकलन) 
16 ऑगस्ट - रक्षाबंधन कार्यक्रम 
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट - महाजनादेश यात्रा 
15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर - विधानसभा स्तरावर नवमतदार संवाद कार्यक्रम 
16 ऑगस्ट - स्व. अटलजी स्मृतीदिन (शक्ती केंद्रस्थानी बूथ कार्यकर्ता एकत्रीकरण)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com