मुख्यमंत्र्यांची तोफ शनिवारी बारामतीत धडाडणार

मुख्यमंत्र्यांची तोफ शनिवारी बारामतीत धडाडणार

बारामती शहर :  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. शनिवारी (ता. 13) संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील सुपे येथे कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजपचे सुरेंद्र जेवरे यांनी ही माहिती दिली. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले असून त्यांनी पूर्ण वेळ बारामतीसाठी दिला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्वतःहून घेतली आहे. त्यांच्या पाठोपाठ आता खुद्द मुख्यमंत्र्यांनी बारामतीच्या रणांगणात उडी मारली आहे. ते आता कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सुपे येथे सभा घेणार आहेत.

सुपे येथील बसस्थानकानजिक असलेल्या मोकळ्या मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा होईल.  शरद पवार व अजित पवार यांच्या विरोधात फडणवीस यांनी धार तीव्र केलेली होती, आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पवार कुटुंबियाना लक्ष्य केलेले असल्याने फडणवीस काय बोलणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

पंतप्रधानांच्या सभेची अनिश्चितता असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची एक तरी सभा बारामती तालुक्यात व्हावी असा भाजपच्य कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्या नुसार आता शनिवारी मुख्यमंत्र्यांची तोफ बारामतीत धडाडणार आहे. गेल्या काही वर्षांत सुप्रिया सुळे यांनीही अनेकदा मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केलेली होती, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बारामतीत येऊन काय बोलतात व कशी टीका करतात या बाबत चर्चेला उधाण आले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com