clean warali want in whole mumbai aditya thackrey | Sarkarnama

रोगराईमुक्त वरळी संकल्पना मुंबईत राबवावी : आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मुंबई : शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. खड्डेमुक्त, कचरामुक्त, रोगराईमुक्त वरळी या त्रिसूत्रीनुसार विकास करण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

 रोगराईमुक्त वरळी ही संकल्पना मुंबईतील सर्व विभागांत राबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ते नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी महापालिका मुख्यालयात आले होते. आमदार म्हणून त्यांनी पहिल्यांदाच महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी वरळीतील विकासकामांबाबत चर्चा केली.
 
नागरिकांच्या सहकार्याने रोगराईमुक्त वरळी संकल्पना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर रोगराईमुक्त मुंबई संकल्पना राबवली गेली पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या सर्व विभागांमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. 

बेस्ट उपक्रमाच्या नव्या बसगाड्या धावणार आहेत; त्यामुळे सेवेत सुधारणा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर या भागात रस्ते व पदपथांचा विकास करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख