Clean Manora surrounding - MLA's Demand LA | Sarkarnama

मनोरा आमदार निवासाचा परिसर हागणदारीमुक्त करा

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 एप्रिल 2017

मनोरा आमदार निवासाची समुद्राकडील जागा हागणदारीमुक्त करण्याची मागणी विधानसभेत आमदारांनी आज केली. 'स्वच्छ भारत मिशन'चे राज्याच्या राजधानीतच तीनतेरा वाजल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मुंबई - वाढत्या उन्हामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूलअसतानाच राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या आमदारांनाही पाणी टंचाईच्या फटका बसला आहे. शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी आपणाला मनोरा आमदार निवासातले पाणी संपल्याने बिनअंघोळीचे विधानसभेच्या पवित्र सभागृहात यावे लागल्याचे सांगताच खळबळ माजली आहे.

मनोरा आमदार निवासाची समुद्राकडील जागा हागणदारीमुक्त करण्याची मागणी विधानसभेत आमदारांनी आज केली. 'स्वच्छ भारत मिशन'चे राज्याच्या राजधानीतच तीनतेरा वाजल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनसाठी आमदार सध्या मुंबईत वास्तव्याला आहेत. मनोरा आमदार निवासात दोन दिवसापासून पाणी टंचाई जाणवत आहे. आमदार हेमंत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. यावेळी पाटील म्हणाले, "पवित्र विधानसभा सभागृहात आम्हाला अंघोळ न करता यावे लागत आहे. मनोरा आमदार निवासाच्या समुद्राकडील बाजूच्या झोपडपट्टीत लोक उघड्यावर शौचास बसतात. आमदारांना सकाळी नको ते दर्शन घडते. तशाच अवस्थेत मासेमारी चालते. त्यामुळे आमदार निवास परिसर तातडीने हागणदारी मुक्त करावा," विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मात्र 'तुम्ही समुद्राच्या दिशेने पाहू नका असे सांगत" सरकार या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचेच दाखवून दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख