Clean Latur | Sarkarnama

स्वच्छ लातूरसाठी प्रयत्न करणार

तुषार खरात
बुधवार, 26 एप्रिल 2017

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. लातूरच्या सामान्य जनतेने विश्वास दाखविला म्हणून हा विजय झाला. लातूरकर अडचणीत असतानाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये पिण्यासाठी पाणी पोचविले. सरकारने आखलेल्या विविध योजना लातूरमधील जनतेपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पोचविल्या. त्यामुळेच लातूरमध्ये आम्हाला यश मिळाले. - संभाजी पाटील निलंगेकर

मुंबई - सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून लातूरचे पिण्याचे पाणी, गटारे, घनकचरा इत्यादी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. लातूरकरांच्या दोन – तीन प्रमुख मागण्यांपैकी स्वच्छ लातूर ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे. त्यावर भर देणार आहोत. 'अमृत' योजनेत लातूरचाही समावेश केलेला आहे. त्याचाही निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला.

निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. या यशाविषयी बोलताना ते म्हणाले, ''भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. लातूरच्या सामान्य जनतेने विश्वास दाखविला म्हणून हा विजय झाला. लातूरकर अडचणीत असतानाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये पिण्यासाठी पाणी पोचविले. सरकारने आखलेल्या विविध योजना लातूरमधील जनतेपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पोचविल्या. त्यामुळेच लातूरमध्ये आम्हाला यश मिळाले.'' लातूरकरांनी दाखविलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख