संध्यादेवी तुम्हीच लढा; नव्याने आग्रह!

विद्यमान आमदार असताना निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतलेल्या श्रीमती संध्यादेवी कुपेकर ह्या एकमेव आमदार आहेत, उद्या त्यांचा निर्णय होईल पण सद्यस्थितीत त्या एकमेव आहेत.
संध्यादेवी तुम्हीच लढा; नव्याने आग्रह!

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ अशी ओळख असलेल्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी रिंगणातून माघार घेण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसात मतदार संघात उमटू लागले आहेत. त्यातून राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते व कंत्राटदार असा वाद उफाळून आला आहे.

दरम्यान, आज गडहिंग्लज येथे आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात कंत्राटदारांविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आला. उद्या श्रीमती कुपेकर यांनी कानडेवाडीत बोलवलेल्या मेळाव्याला हजेरी लावून त्यांना राष्ट्रवादीकडूनच रिंगणात उतरण्याचा आग्रह करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे उद्याची बैठक गाजण्याची शक्‍यता आहे.

गेल्या निवडणुकीत उमेदवारी न घेण्यासाठी धमकी दिल्याचा मुद्दा पुढे करून श्रीमती कुपेकर यांनी भावनिक साथ मिळवली. त्यानंतर त्यांच्यापेक्षा त्यांच्या कन्या सौ. नंदिती बाभूळकर याच चंदगडच्या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांचे सासर हे नागपूर आहे, त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत त्यांनी भाजपाला जोडण्याचे प्रयत्न केले. यात या मतदार संघातील कंत्राटदार आघाडीवर आहेत, या कंत्राटदारांकडून लढायचे झाले तर भाजपाकडूनच असा आग्रह त्यांच्याकडे धरला आहे. पण दुसरीकडे कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादीकडून त्यांनी लढावे यासाठी आग्रही आहेत. त्यातून निवडणूक न लढण्याचाच निर्णय त्यांनी घेतला. याविरोधात चंदगडच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन केले पण त्यात इतर तालुक्‍यातील कार्यकर्ते का नाहीत ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या पार्श्‍वभुमीवर श्रीमती कुपेकर यांच्या मागे असलेल्या कंत्राटदारांनाच धडा शिकवण्याचा निर्णय आज गडहिंग्लजमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत तीन तालुक्‍यातील पक्षाचे आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटी, जिल्हा बॅंक, साखर कारखान्याच्या संचालकांसह 200-250 कार्यकर्ते उपस्थित होते. उद्याच्या श्रीमती कुपेकर यांच्या मेळाव्याला हजर राहून त्यांना राष्ट्रवादीकडूनच रिंगणात उतरण्याचा आग्रह करण्याचेही यावेळी ठरले.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com