cite festival and aurangabad | Sarkarnama

पतंग महोत्सवात औरंगाबादमध्ये " पक्षीय काटाकाटी '

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

औरंगाबाद : मकरसंक्रांती निमित्त शहरात राजकीय पतंगबाजीला उधाण आले आहे. शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांच्या वतीने स्वतंत्रपणे पंतग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, नगरसेवक अनिल मकरिये यांनी तर शिवसेनेकडून शहप्रमुख बाळासाहेब थोरात, नगसेवक नारायण सुरे यांनी पतंग महोत्सवानिमित्त नेत्यांना आमंत्रित केले होते. 

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना-भाजप या दोन मित्रपक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. याचे सावट आजच्या पतंग महोत्सवावर देखील दिसले. ऐरवी एकमेकांच्या महोत्सवात सहभागी होत पंतग कापणारे नेते आज मात्र स्वतंत्रपणे पतंग उडवतांना दिसले. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले आदींनी टिव्ही सेंटर आणि हर्सुल येथील महोत्सवात सहभाग नोंदवत पंगतबाजीचा आनंद लुटला. तर सिडको एन-7, औरंगपुरा भागात भाजपच्या नेत्यांनी डीजेच्या दणदणाटात पंतग उडवले. 

जैस्वालांच्या पतंगाला घोडेले यांची ढील... 
टीव्ही सेंटर मैदानावर आमदार प्रदीप जैस्वाल यांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. ठाकरे सरकार लिहिलेला पतंग उडवत असतांना त्याला महापौर नंदकुमार घोडेले चक्रीतून ढिल देतांना दिसले. तर या दोघांच्या पतंगबाजीकडे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे लक्ष देऊन पाहत होते. थोड्यावेळाने जैस्वालांचा पतंग आपल्या हातात घेत खैरेंनी देखील चल ढील दे म्हणत पतंगबाजीचा आनंद घेतला. नेत्यांची ही पतंगबाजी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक कौतुकाने न्याहळत होते. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट व अंबादास दानवे मात्र आज या पतंगबाजीला मुकले. हे दोघेही मुंबईत असल्यामुळे त्यांना महोत्सवात सहभागी होता आले नाही. 

भाजपचे आमदार अतुल सावे यांनी एन-7 च्या रामलीला मैदानात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पतंगबाजी केली. सिंगापूर कॉम्पलेक्‍सच्या गच्चीवर शहराध्यक्ष तनवाणी यांनी दरवर्षी प्रमाणे पंतग महोत्सवाचे आयोजन केले होते. या निमित्ताने आज शहरात पाच हजाराहून अधिक पतंग आकाशात उडले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख