cidco will develop purandar airport | Sarkarnama

पुरंदर विमानतळाचा सिडको विकास करणार

सुजित गायकवाड
गुरुवार, 11 जुलै 2019

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पुरंदर विमानतळ उभारणीस सिडको हातभार लावणार आहे. राज्यभरात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संयुक्त कंपनी विशेष हेतू (स्पेशल पर्पज व्हेईकल) म्हणून एसपीव्ही स्थापन करण्यात आली आहे. याच्या अध्यक्षपदी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची निवड करण्यात आली आहे.

पुरंदर विमानतळाच्या गुंतवणूकीपैकी पहिली रक्कम म्हणून 25 कोटी 50 हजार रूपयांची रक्कम देण्यास सिडको संचालक मंडळाने मंजूरी दिली. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ उभारण्याची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कंपनीकडे सोपवली आहे. 10 नोव्हेंबर 2017 ला सरकारने राज्यातील सर्व विमानतळांसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी ही नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केली आहे. सदर विमानतळाच्या विकासासाठी संयुक्त कंपनी/ विशेष हेतू कंपनीच्या स्थापनेसही मान्यता देण्यात आली आहे.

या विशेष कंपनीत सिडकोचेच सर्वाधिक समभाग ठेवण्यात सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार विमानतळाच्या उभारणीच्या कामात सिडकोचे 51 टक्के समभाग असणार आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्र विकास कंपनीचे 19 टक्के, एमआयडीसी व पीएमआरडीए यांचे अनुक्रमे 15 टक्के समभाग असणार आहे.

या विमानतळ प्रकल्पात सिडकोचे सर्वाधिक समभाग असल्याने सिडकोतर्फे तब्बल दोन हजार 40 कोटींचा निधी दिला जाणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी 760 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. सिडकोने सध्या या प्रकल्पाला 25 कोटी 50 हजार रूपये रक्कम देणार आहे. उर्वरीत रक्कम टप्प्या-टप्प्याने अदा केली जाणार आहे. विमानतळाच्या एसपीव्हीवर लोकेश चंद्र यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत एकूण 14 जणांचे संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. सदरच्या विमानतळासाठी जमिन संपादीत करणे, नुकसानभरपाई व पूर्नवसन करण्याची जबाबदारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख