चौंडीतील अहिल्यादेवी जयंतीतील गोंधळामागे राष्ट्रवादी? 

चौंडीतील अहिल्यादेवी जयंतीतील गोंधळामागे राष्ट्रवादी? 

नगर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड) येथील जयंती महोत्सवात धनगर आरक्षणावरून आज गोंधळ झाला. या पाठीमागे पालकमंत्री राम शिंदे यांच्या राजकीय विरोधकांबरोबरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे. 

सभेत गोंधळ घातल्याप्रकरणी इंद्रकुमार भिसे, किशोर मासाळ, सुरेश कांबळे यांच्यासह सुमारे 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किशोर मासाळ हे बारामती येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे युवक राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील पद आहे. या गोंधळात बारामती, शिरुरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

इंद्रकुमार भिसे हे शिंदेंचे विरोधक आहेत. त्यांनी पाठीमागील निवडणूक जामखेड मतदारसंघातून शिंदेंविरोधात लढवली होती. गोंधळावेळी ते एकटेच घोषणा देत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीशी संबंधित कार्यकर्त्यांन गोंधळास सुरवात केली. कांबळे यांचाही दोन वर्षांपासून शिंदेशी वाद आहे. 

भिसेंनी राम शिंदेंना केलेली शिवीगाळ आणि त्यानंतर राष्ट्रवादीशी संबंधित केलेला गोंधळ, या बाबी एकामागे एक घडल्या. किशोर मासाळ हे पत्रकार कक्षात बसले होते. राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना डॉ. भिसे व मासाळ यांनी यांनी अचानक आरडाओरडा करीत धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी केली. त्यानंतरच गोंधळ उडाला व दगडफेक झाली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com