चित्रकूट कॉंग्रेसने जिंकले  - chitrakut congress win | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

चित्रकूट कॉंग्रेसने जिंकले 

वृत्तसंस्था
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

भोपाळ : मध्यप्रदेशातील चित्रकूट विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली. कॉंग्रेसचे उमेदवार निलांशू चतुर्वेदी हे मोठ्या मतांनी विजयी झाले. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शंकरदयाळ त्रिपाठी यांचा पराजय केला. कॉंग्रेसला आपला हा गड राखून ठेवण्यात यश आले आहे. चित्रकूट कोणत्याही परिस्थितीत खेचून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली होती. 

या निवडणुकीकडे संपूर्ण मध्यप्रदेशचे लक्ष्य लागून राहिले आहे. ही जागा कॉंग्रेसचीच होती. विद्यमान आमदार प्रेमसिंह (वय.65) यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. कॉंग्रेसचे निलांशू आणि भाजपचे उमेदवार शंकरदयाल त्रिपाठी यांच्यात खरा सामना रंगला होता. कडक सुरक्षा व्यवस्थेत सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. कॉंग्रेसचा उमेदवार सुरवातीपासूनच आघाडीवर होता. कॉंग्रेसचे उमेदवार निलांशु विजयी झाल्याचे समजताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 

या दोन उमेदवारासह एकून बाराजण मैदानात होते. सत्ताधारी भाजपने ही जागा खेचून आणण्यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र कॉंग्रेसने आपला हा मतदारसंघ राखून ठेवण्यात यश मिळविले. दरम्यान, या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री चौहान ज्या तुर्रा गावात एक रात्र थांबले होते. त्या गावात मुख्यमंत्री येण्यापूर्वी शौचालय तातडीने बांधण्यात आले होते. मात्र त्यानंतर पाडण्यात आल्याने लोकांमध्ये संताप होता. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री थांबले होते त्या परिसरातील लोकांनी आपले अमूल्य मत कॉंग्रेसच्या पारड्यात टाकल्याचीही चर्चा आहे. तुर्रा गावात एकून 1042 मतदार आहेत त्यापैकी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 403 आणि भाजप उमेदवाराला 203 मते पडली आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख