कचरा वेचणाऱ्या महिलांचा "कौशल्या"त समावेश हवा : वाघ - chitra wagh ncp | Politics Marathi News - Sarkarnama

कचरा वेचणाऱ्या महिलांचा "कौशल्या"त समावेश हवा : वाघ

सुचिता रहाटे: सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियाना संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. कचरा वेचणाऱ्या महिलांचा या अभियानांतर्गत समावेश करावा अशी मागणी त्यांनी यावेळी मंत्री निलेंगकर यांच्याकडे केली आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियाना संदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. कचरा वेचणाऱ्या महिलांचा या अभियानांतर्गत समावेश करावा अशी मागणी त्यांनी यावेळी मंत्री निलेंगकर यांच्याकडे केली आहे. 

"सरकारनामा'शी बोलताना वाघ यांनी सांगितले, की अनेक युवक युवतींनी माझ्याकडे या अभियाना संदर्भात विचारणा केली होती. राज्यात जिल्ह्यांत या अभियाना अंतर्गत जागा रिक्त असून या अभियानाचा लाभ या जिल्ह्यातील युवक युवतींना मिळावा अशी आपली मागणी आहे. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी मुद्रा कर्जासाठी अनेक गरजू व्यक्तींनी अर्ज दाखल केला आहे. परंतु, अनेक लोकांना या कर्जाचा लाभ मिळण्यासाठी अडथळे येत आहेत. कौशल्य विकास अंतर्गत अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे अभियान तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. 

प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजगता अभियान व उद्योग केंद्रित कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत महाराष्ट्रात बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी विविध नामांकित कंपन्यांबरोबर करार करण्यात आले आहेत. यामध्ये युएनडीपी, टाटा ट्रस्ट, टेक महिंद्रा फाउंडेशन, एमटी एडूकेअर ग्रुप, जेएससडब्लू, रुस्तमजी, वोल्सवॅगन, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय, बॉम्बे स्टॉक एक्‍सचेंज, नासकॉम इत्यादी नामवंत कंपन्यांचा समावेश केला आहे. तसेच राज्यातील चारशे खेड्यातील महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यार असल्याने या अभियानाबाबत बऱ्याच गरजू महिलांनी संपर्क साधला व मदतीची मागणी केली. म्हणून यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मी कौशल्य विकास मंत्री निलंगेकर यांची भेट घेतली असे वाघ यांनी स्पष्ट केले. याबाबत विचार करून त्यावर तोडगा काढू असे आश्वासन निलंगेकर यांनी दिले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख