सरकारची ऐपत नसेल तर पिडीतेचा उपचार आम्ही करु ः चित्रा वाघ

chitra wagh criticizes government hinganghat woman burn issue
chitra wagh criticizes government hinganghat woman burn issue

नागपूर - सोमवारी (ता. 3) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 24 वर्षीय प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पिडीता 40 टक्के भाजली आणि आजही येथील ऑरेंज सीटी हॉस्पीटलमध्ये मृत्युशी झुंज देत आहे. उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. पण उपचाराची रक्कम संबंधितांना मिळाली नसल्याचा दावा करुन "सरकारची ऐपत नसेल, तर पिडीतेच्या उपचाराचा खर्च भारतीय जनता पक्ष करेल', असे भाजपच्या महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

सतत दोन दिवसांपासून उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, अशा घोषणा केल्या जात आहेत. पण मुख्यमंत्री सहायता निधितून आजपर्यंत रुग्णालय प्रशासनाला रक्कम मिळालेली नसल्याचे पिडीतेच्या नातेवाईकांनी आपल्याला सांगितले. काल दुपारी रुग्णालय प्रशासनाने आपल्याला 40 हजार रुपये जमा करण्यास सागितल्याचे पिडीतेच्या नातेवाईकांनी आपल्याजवळ म्हटल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या. 

हा सरकारचा कोडगेपणा आहे. कोडगेपणा किती असावा, याची मर्यादा राज्य सरकारने ओलांडली आहे. हिंगणघाटच्या घटनेसाठी सरकारने महाराष्ट्राला उत्तर द्यायला हवे. मुलीला बारावीपर्यंतच शिकवून घरी बसवले असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे पिडीतेच्या पालकांनी म्हटल्याचेही श्रीमती वाघ यांनी म्हणाल्या.

राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात आणि भाषणांत महीला सुरक्षा हा विषय अग्रक्रमावर असतो. पण प्रत्यक्षात तसे काहीही केले जात नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्याच्या गृहमंत्र्याच्या शेजारच्या जिल्हात क्रौऱ्याची परीसीमा गाठणारी ही घटना घडली. त्यामुळे त्यांना आता खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे सांगून येथून आपण हिंगणघाटला जाणार असून ज्या महाविद्यालयात पिडीता प्राध्यापक आहे, त्या महाविद्यालयाला भेट देणार आहोत आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांचीही भेट घेणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com