chirag paswan welcome rahul gandhi | Sarkarnama

राहुल गांधी अच्छे कर रहे है !, चिराग पासवानांनी उधळली स्तुतीसुमने 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील "एनडीए' त प्रचंड अस्वस्थता आहे. एकीकडे परममित्र शिवसेना नाराज आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर कल्याणमध्ये बहिष्कार टाकला. यापूर्वी "टीडीपी', त्यानंतर कुशवाह बाहेर पडले आता रामविलास पासवान यांचा पक्षही नाराज आहे. पासवान यांचा "एलपीजी'ही एनडीएतून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

पासवान यांचे पूत्र चिराग यांनी तर कधी नव्हे इतके राहुलबाबांचे कौतुक केले. "राहुल गांधी अच्छे कर रहे है !'' असे सांगत कॉंग्रेसने आणखी मेहनत घेतली तर त्यांना फायदा होऊ शकतो असे सांगत भाजपला एकप्रकारे इशार दिला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या यशाचे पासवान यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले, की "टीडीपी' आणि कुशवाह यांची "रालोसपा' बाहेर पडल्याने "एनडीए'ची ताकद कमी झाली आहे. कॉंग्रेसचा तीन राज्यात विजय झाल्याने राहुल यांचा उत्साह वाढला आहे. 

एका दूरचित्रवानीशी बोलताना ते म्हणाले, "" कॉंग्रेसनेही खूप आनंदी होता कामा नये. कारण राजस्थान आणि मध्यप्रदेशात या पक्षाला मिळालेला विजय एकतर्फी नाही. कॉंग्रेस काटावर पास झाली आहे. त्यामुळे त्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे. दोन पक्ष "एनडीए'तून बाहेर पडल्याने आमची ताकद कमी झाली आहे. यासाठी भाजपने मित्रपक्षांना सन्मानाने वागविले पाहिजे. आज जे "एनडीए'त आहेत त्यांना सांभाळले पाहिजे.'' 

भाजपला इशारा देताना ते म्हणाले, की राममंदिर हा "एनडीए'चा नव्हे तर भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्‍न आहे. दरम्यान, बिहारमधील जागा वाटपावरूनही पासवान यांचा पक्ष भाजपवर नाराज आहे. त्यामुळेच की काय भाजपवर दबाव आणण्यासाठी त्यांनी राहुल गांधीचे कौतुक करण्यास सुरवात केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख