चिपळूण मतदारसंघात शिवसेनेचा जोर पण शेखर निकमांची हवा!

पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे जाळे, भाजपची साथ आणि बेरकी नेतृत्व या जोरावर चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाटत असला तरी संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचीच हवा असल्याचे चित्र मतदानानंतर पाहायला मिळाले. विजयी उमेदवाराच्या यशात यावेळीही संगमेश्‍वर तालुकाच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
Chiplun Constituency Sadanand Chavan - Shekhar Nikam
Chiplun Constituency Sadanand Chavan - Shekhar Nikam

देवरूख : पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे जाळे, भाजपची साथ आणि बेरकी नेतृत्व या जोरावर चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाटत असला तरी संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचीच हवा असल्याचे चित्र मतदानानंतर पाहायला मिळाले. विजयी उमेदवाराच्या यशात यावेळीही संगमेश्‍वर तालुकाच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघात यावेळी सरासरी ६६ टक्‍के मतदानाची नोंद झाली आहे. ही नोंद गेल्या वेळेपेक्षा २ टक्‍क्‍यांनी अधिक आहे. यामुळे वाढीव मतदान कुणाला याबाबत चर्चा सुरू असतानाच राजकीय जाणकारांकडून माहिती घेतली असता ज्यावेळी उत्स्फूर्त मतदान होते त्यावेळी तो प्रस्थापितांविरोधातील कौल असतो असे सांगण्यात आले. यामुळे वाढीव मतदानाने शिवसेनेसाठी लाल बावटा दाखवल्याची चर्चा नाक्‍यानाक्‍यावर ऐकायला मिळत आहे. या मतदारसंघात यावेळीही राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांच्यात राजकीय घमासान झाले. शेवटच्या टप्प्यापर्यंत कोण बाजी मारणार याचा अंदाज आलेला नाही. त्यामुळे निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत चिपळूण तालुक्‍यातून समसमान कौल आला असताना संगमेश्‍वर तालुक्‍यातील माखजन जिल्हा परिषद गटातून विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना भक्‍कम जनादेश मिळाला. याच जोरावर त्यांनी ६ हजारांनी बाजी मारत लढत जिंकली होती. यावेळीही चिपळूण तालुक्‍यातील वातावरण दोन्ही उमेदवारांसाठी बऱ्यापैकी समान आहे. अशा स्थितीत संगमेश्‍वर तालुका ज्याला कौल देईल तोच उमेदवार विजयी होणार असे वातावरण दिसत आहे. 

संघटनेचे मजबुत जाळे, एकापेक्षा एक सरस बेरकी नेतृत्व, त्यात मोक्‍याच्या क्षणी भाजपने दिलेली साथ या जोरावर मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाटत असला तरीही मतदान झाल्यानंतर मतदारसंघाचा मागोवा घेतला असता बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांचीच हवा असल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदानंद चव्हाण हेच हॅटट्रीक करतील असा छातीठोक दावा करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी बदल होणारच असे विश्‍वासाने सांगताना दिसत आहेत. दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपापल्या उमेदवाराच्या विजयाचा दावा करत असले तरी याचे खरे उत्तर अवघ्या दोनच दिवसांनी मिळणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com