`राजकीय भूमिका पटो न् पटो; पण माणसाचा साधेपणा कमाल आहे!'

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा साधेपणा अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांबाबत काय वाटलं, याची एक पोस्टच फेसबुकवर टाकली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत अभिनेता चिन्मय मांडलेकर. (छायाचित्र - चिन्मय मांडलेकर यांचे फेसबुक पेज)
वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत अभिनेता चिन्मय मांडलेकर. (छायाचित्र - चिन्मय मांडलेकर यांचे फेसबुक पेज)

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा साधेपणा अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना चांगलाच भावला आहे. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांबाबत काय वाटलं, याची एक पोस्टच फेसबुकवर टाकली आहे.

नागपूर विमानतळावर फ्लाईटची वाट पाहताना मांडलेकर यांनी आंबेडकरांना पाहिलं. परंतु त्यांचा डोळ्यावर विश्वास बसला नाही. कारण आंबेडकरांचा साधेपणा!  हा अनुभव मांडलेकर यांच्याच शब्दांत : 

काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं "आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो". पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं "अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत." महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.आय.पी ट्रीटमेंट नाही. एअरपोर्टवर बसायला ही जागा नसताना जवळ जवळ ४० मिनिटं ताटकळत उभे होते. अर्थात लोकं भेटत होती, फोटो काढत होती. आमची भेट झाल्यावर मनमोकळ्या गप्पा मारत उभे राहिलो. राजकीय भुमिका पटो न पटो, पण माणसाचा साधेपणा कमाल आहे! आज सामान्य पक्षीय पदाधिकारीदेखील लवाजमा घेतल्याशिवाय फिरत नाहीत, तिथे हा पक्षप्रमुख सामान्यासारखा पाठीवर सॅक मारुन रांगेत उभा राहतो हे विलक्षण आहे. बाय द वे, ज्या एअरपोर्टवर हे झालं त्या एअरपोर्टला यांच्याच आजोबांचं नाव आहे. तरीही No VIP treatment!
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com