chindam voting machine | Sarkarnama

छिंदमच्या भावाकडून मतदान यंत्राची पूजा 

मुरलीधर कराळे 
रविवार, 9 डिसेंबर 2018

नगर: महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या फोटोवर जादुटोणा चे साहित्य ठेवून दोन दिवस झाले नाही, तोच मतदान यंत्राची पुरोहिताकडून पुजा करून अंधश्रद्धेचे गुऱ्हाळ कायम राहिले आहे. विशेष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरून हद्दपार असलेला उमेदवार श्रीपाद छिंदम याच्या भावाने मतदान यंत्राची पूजा करून मतदान केले. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी . पासून मतदान सुरू झाले. केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू असून, सुमारे दोन हजार कर्मचारी नियुक्तीस आहेत. शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. 

या निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. एकूण प्रभागांत जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होतआहे. काल रात्री शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्याने धारदार शस्त्राने वार केल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. संवेदनशील तर अतिसंवेदनशील मतदान केंद्रे असून, त्यावर पोलिस बंदोवस्त चोख आहे. 

आज सकाळपासून सुरू झालेल्या या मतदानप्रक्रियेदरम्यान सारडा महाविद्यालयात तासभर मशिन बंद होते, त्यामुळे गोंधळ उडाला होता. मतदान यंत्रात कागद व खडे असल्याची अफवा सुरू झाल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला होता. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख