आमदार बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊ नका ; खासदार चिखलीकरांचे प्रधान सचिवांना पत्र

आमदार बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊ नका ; खासदार चिखलीकरांचे प्रधान सचिवांना पत्र

औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांच्या संदर्भात गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊ नका असे सांगणारे पत्र नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रधान सचिवांना पाठवले आहे. तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करण्याचा त्यांच्या धंदा असल्याचा खळबळजनक आरोप देखील चिखलीकरांनी आपल्या पत्रात केला आहे. या पत्राला आमदार बंब यांनी देखील उत्तर देत चिखलीकरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 22 नोव्हेंबर 2019 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाच्या प्रधान सचिवांना एक पत्र पाठवले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सुरू असलेल्या विकासकामांच्या संदर्भात आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या कुठल्याच तक्रारींची दखल घेण्यात येवू नये अशी विनंती करण्यात आली आहे. लोहा विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रगतीपथावर असून त्यात केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत पेनूर-शेवडी- सोनखेड- बारूळ रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. या कामांची तक्रार आमदार प्रशांत बंब यांच्याकडून करण्यात आली आहे. बंब हे अशा तक्रारी करून ब्लॅकमेलिंग करतात व विकासकामांमध्ये जाणीवपुर्वक अडथळा निर्माण करतात. 

नांदेड जिल्ह्यातील कामांशी कुठलाही संबंध बंब यांचा नाही, तरी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व पत्रव्यवहार करतात. त्यानंतर तडजोडी करून संबंधित ठेकेदाराकडून रक्कम वसुल करतात असा आरोप देखील चिखलीकरांच्या पत्रात करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com