कोल्हापुरातील चिखली-प्रयागमध्ये सहा हजार लोकांचा जीव धोक्यात : दोन हेलिकाॅप्टर दाखल

कोल्हापुरातील चिखली-प्रयागमध्ये सहा हजार लोकांचा जीव धोक्यात : दोन हेलिकाॅप्टर दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग चिखलीमध्ये पुरस्थिती अत्यंत गंभीर होत असून प्रचंड मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांमधून वर्तवली जात आहे. पाण्याचा प्रवाह वाढतच आहे.

आज दिनांक (7-8-2019 रोजी प्रयाग चिखलीतील 10 घरे कोसळून पुराच्या पाण्यात नष्ट झाली. यामध्ये शंभराहून अधिक लोक बेपत्ता होऊन मोठी जीवीतहानी होण्याचा धोका आहे. गावातील लोकांनी आपली दुभती मुखी जनावरे पाण्यातून सोडून दिली आहेत. यात असंख्य जनावरे मृत्युमूखी पडलेली आहेत. सर्व गावातील वीजपुरवठा खंडीत झाला असून अनेकांची घरे बुडाली गावामध्ये पाण्याशिवाय मोकळी जागाच नाही.
 
या लोकांची सुटका करण्यासाठी तटरक्षक दलाचे गोवा येथील दोन हेलिकाॅप्टर दाखल झाल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. एकूण 6 हजार लोकांचा जीव धोक्यात आहे. एवढी गंभीर स्थितीस होऊनसुद्धा गेला आठवडा उलठून गेला अद्याप शासनाची कोणतीच मदत मिळालेली नाही आम्ही मरण पावल्यानंतर शासन जागे होणार का,असा शब्दांत पुरात अडकलेले सर्व चिखलीतील लोक संताप व्यक्त करत आहेत.

शहरातही परिस्थिती बिकट

रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहने येऊ शकत नाही, हवामान खराब असल्यामुळे हवाई वाहतूक कोल्हापूर पर्यंत पोहोचू शकत नाही, आणि रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे रेल्वे वाहतूक कोल्हापुरात पोहोचू शकत नाही. अशा तीनही दळणवळणाच्या साधनावर मर्यादा आल्यामुळे कोल्हापूरचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. 

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कोल्हापूर नाजीक सहा फूट पाणी असल्यामुळे कोल्हापुरात मदत पोहोचणे आणखी अवघड झाले आहे. कोल्हापूरला चोहोबाजूंनी संपर्क तुटला असून तब्बल 24 तास झाले पूरग्रस्त मदतीसाठी आतुरलेले आहेत.

शहरातील अंतर्गत रस्तेही बंद असल्यामुळे हॉस्पिटल मधील रुग्णांना पर्यायी व्यवस्था करण्यात ही अपयश येत आहे.
गगनबावडा, पन्हाळा, गारगोटी, सांगली या मार्गावर सुद्धा महापुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. अवजड वाहनातून सुद्धा वाहतूक करणे धोकादायक बनत चालले आहे.  पावसाचा जोर कायम असून तब्बल 54 फुटाहून अधिक पाणी पातळी वाढली आहे.
धोका पातळीपेक्षाही पातळी 11 फुटाने जास्त आहे. कोल्हापुरात येणारे सर्वच मार्ग बंद असल्याने कोल्हापुरातून परगावी गेली नागरिक सुद्धा कोल्हापुरात परत येणे शक्य होत नाही. लष्कराच्या 106 जवानांची एक तुकडी काल रात्री राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली असूनही ती सकाळी नऊपर्यंत शहरात पोहोचू शकली नाही. मिरज कोल्हापुर रेल्वे सुद्धा बंद असल्याने कोल्हापूर चां संपर्क सर्व बाजूने तुटला आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टर सह अन्य यंत्रणा कोल्हापुरात पोहोचू शकली नाही. पिंपरी-चिंचवड होऊन सहा बो टी ची  मागणी केली असून त्याही अद्याप कोल्हापुरात पोहोचल्या नाहीत. महामार्गासह पर्यायी रस्ते बंद असल्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी येणारी ही यंत्रणा अडकून पडली आहे.
.....

कोल्हापूर शहर आणि परिसरात येत्या चार-पाच तासांत किमान दहा-पंधरा बोटी, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षित असलेले इतर जवान मदतीसाठी पोहचले नाहीत. तर पूर परिस्थिती अडकून असलेल्या सुमारे अडीच तीनशेहून अधिक पूरग्रस्तांचा जीव धोक्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com