भाजपमधील इच्छुकांची भाऊगर्दी पडू शकते कॉंग्रेसच्या पथ्यावर? 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या चिखली मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, बसपा, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इच्छुकांमध्ये शक्तीप्रदर्शन करण्याची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची वाढलेली भाऊगर्दी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपमधील इच्छुकांची भाऊगर्दी पडू शकते कॉंग्रेसच्या पथ्यावर? 

चिखली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या चिखली मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, बसपा, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इच्छुकांमध्ये शक्तीप्रदर्शन करण्याची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची वाढलेली भाऊगर्दी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

राज्यात 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघ सध्या कॉंग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या ताब्यात आहे. 

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार बोंद्रे यांना भाजपचे सुरेशआप्पा खबुतरे यांनी जोरदार टक्कर दिली होती. मात्र, थोड्या फरकाने खबुतरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. आगामी निवडणुक लक्षात घेता आमदार बोंद्रे यांनी ग्राऊंड लेव्हलवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर गत काळातील अनुभव लक्षात घेता सुरेशआप्पा खबुतरे यांनी गत वर्षभरापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी भाजपमध्ये आमदारकीसाठी वाढलेली इच्छुकांची भाऊगर्दी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडू शकते. या मतदारसंघात कॉंग्रेसकडून आमदार राहुल बोंद्रे यांचे स्थान पक्के समजले जात आहे. 

भाजपचे सुरेशआप्पा खबुतरे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्यासह अनेक पदाधिकारी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. 

कॉंग्रेसमधून स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतलेले नरेंद्र खेडेकर, संजय चेके पाटील, माजी आमदार रेखाताई खेडेकर, विजयकुमार कोठारी, तसेच चिखलीच्या नगराध्यक्ष प्रियाताई बोंद्रे यांचे पती कुणाल बोंद्रे यांचे नाव सुद्धा विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये घेतल्या जात आहे. 

या मतदारसंघात माजी आमदार रेखाताई खेडेकर ह्या सुद्धा प्रबळ उमेदवार समजल्या जातात. सौ. खेडेकर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये असल्या तरी त्यांची भूमिका आज रोजी अस्पष्ट वाटत आहे. कारण मध्यंतरी भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रेखाताई खेडेकर भाजपाकडून लोकसभा किंवा विधानसभेकडून उमेदवारी मिळाल्यास उमेदवारी लढवू शकतात अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. रेखाताई राष्ट्रवादी कॉंग्रेस की भाजप यापैकी काय निर्णय घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. 

प्रा. नरेंद्र खेडेकर यांना राजकारणाचा कोणताही वारसा नसतांना शिवसेना कार्यकर्ता ते जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी केलेला प्रवास निश्‍चितच उल्लेखनीय आहे. कॉंग्रेसचे नेते मुकूल वासनिक यांनी प्रा.खेडेकर यांची ताकद तथा राजकारणातील कौशल्य ओळखून त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहचविले होते. परंतु, आज रोजी कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी परत थेट मातोश्रीचा रस्ता धरला असून ते स्वगृही परतले आहेत. 

शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असलेले प्रा. खेडेकर निवडणूक डोळ्यासमोर मतदारसंघातील दौरे करीत आहे. कॉंग्रेस पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आणि सध्या भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार धृपतराव सावळे मराठा समाजाचे नेते असून चिखली मतदारसंघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. पक्षश्रेष्ठीने संधी दिल्यास तेदेखील लोकसभेची अथवा विधानसभेची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

भाजपचे नेते संजय चेके पाटील यांनी सामाजिक उपक्रमातून जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. तर अंबीका अर्बन परिवाराचे अध्यक्ष ऍड. विजयकुमार कोठारी यांचा देखील मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून तेदेखील इच्छूक असल्याचे समजते. चिखली नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यांचे पती कुणाल बोंद्रे यांनी जनसंपर्काच्या माध्यमातून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

एकंदरीत कॉंग्रेसकडून आमदार राहुल बोंद्रे यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात असली तरी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची वाढलेली भाऊगर्दी कॉंग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com