chikhaldara-raj-thakare-tour | Sarkarnama

राज ठाकरे मेळघाटमधील दुर्गम चिलाटी गावात; आदिवासींशी साधला संवाद

राज इंगळे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

दसऱ्याला चिखलदऱ्यात दाखल झालेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मेळघाटच्या अतीदुर्गम भागातील चिलाटी या गावाला भेट दिली. या ठिकाणी कार्यरत असलेल्या "मेळघाट मित्र' या संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासोबतच त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधला.

चिखलदरा : दसऱ्याला चिखलदऱ्यात दाखल झालेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मेळघाटच्या अतीदुर्गम भागातील चिलाटी या गावाला भेट दिली. या ठिकाणी कार्यरत असलेल्या "मेळघाट मित्र' या संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासोबतच त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधला.
 
"मेळघाट मित्र" ही संस्था मेळघाटातील अतिदुर्गम भागात असलेल्या हतरूपासून तीन किलोमीटर अंतरावरील चिलाटी गावात प्रमुख्याने काम करते. या गावाला लागून असलेल्या अन्य गावात सुद्धा या संस्थेचे सामाजिक कार्य सुरू आहे. 
आदिवासी बांधवांना भेडसाविणाऱ्या विविध समस्या दूर करण्यासोबतच जनजागृतीचे काम सुद्धा या संस्थेच्या माध्यमाने करण्यात येते. 

गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ही संस्था चिलाटी या दुर्गम भागात कार्यरत असलेली ही संस्था मुळची पुण्याची आहे. नेमकं हेच हेरून राज ठाकरे यांनी चिलाटी या गावाला भेट देत माहिती जाणून घेतली. 

दरम्यान, आज सकाळी राज ठाकरे यांनी चिखलदऱ्याच्या विश्रामगृहावर मनसेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते सेमाडोहकडे रवाना झाले. 

सेमाडोह, कोलकासच्या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत ते थेट दुर्गम भागातील चिलाटी गावात दाखल झाले. मेळघाट मित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांशी तसेच आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील समस्या जाणून घेतल्या. मेळघाट मित्र ही संस्था ज्या गावात शिक्षक नसेल किंवा काही शैक्षणिक अडचणी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करते. आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य सुद्धा या संस्थेने केले आहे, त्यामुळेच राज ठाकरे यांनी या संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख