chief secretery retirement issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
जालना: अर्जुन खोतकर कैलास गोरंट्याल यांच्यात कडवी झुंझ
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांची तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या दत्ता बहिरटांची आघाडी
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना मुदतवाढ द्यावी की न द्यावी?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अजोय मेहता, यू. पी. एस. मदान यांची मुख्य सचिवपदाची संधी हुकण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ द्यावी किंवा नाही याबाबत राज्य सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जैन यांना मुदतवाढ दिल्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांची मुख्य सचिवपदाची संधी हुकण्याची शक्‍यता आहे. हे दोघेही पुढील वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जैन यांच्या मुदतवाढीबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

दिनेशकुमार जैन 31 जानेवारी 2019 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आगामी लोकसभा निवडणुका यामुळे जैन यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्‍यता आहे. मुदतवाढ मिळावी यासाठी स्वत: जैन हे प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र, त्यांना मुदतवाढ दिल्यास मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत असलेल्या अजोय मेहता आणि यू. पी. एस. मदान यांना मुख्य सचिव म्हणून कमी कालावधी मिळणार आहे. 

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. पोरवाल यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते, यावर मुख्य सचिव कोण हे ठरणार आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून मेहता आणि मदान या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. गृह विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मदान यांची नेमणूक झाल्यास मुख्य सचिवपदी मेहतांची वर्णी लागू शकते. मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेले मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या विशेष मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख