तुकाराम मुंढेंना मुख्य सचिवांना अतितात्काळ बोलावलयं! माहितीसाठी की बदलीसाठी? - chief secretary calls immediately to mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

तुकाराम मुंढेंना मुख्य सचिवांना अतितात्काळ बोलावलयं! माहितीसाठी की बदलीसाठी?

अतुल मेहेरे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

....

नागपूर : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे. महापालिकेच्या कामकाजासंदर्भात अद्ययावत माहिती घेऊन हजर रहावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहे. यासंदर्भात महापालिकेत "अतितत्काळ' असा शेरा असलेले पत्र पोहोचले. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या मंगळवारी महापालिकेत कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीने महापालिकेत कामकाजाला सुरुवात केली. गेल्या आठ दिवसांत त्यांनी महापालिकेत जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. शनिवार आणि रविवारी त्यांनी शहरातील रस्त्यांवरील बाजारांवर एकाचवेळी कारवाईचे निर्देश दिले. या कारवाईमुळे भाजीविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी संतापही व्यक्त केला. मात्र, रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कारवाईचे स्वागत केले. 

शनिवारपासून ते मुंबईतच आहेत. काल महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या संदर्भातील बैठकीत ते उपस्थित होते. ते नागपुरात पोहोचण्यापूर्वीच मुख्य सचिवाचे त्यांच्या नावे पत्र आले. नागपूर महापालिकेतील कामकाजासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 7 फेब्रुवारीला मंत्रालयातील सहाव्या माळ्यावरील मुख्य सचिवांच्या कक्षात ही बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिकेची अद्ययावत माहितीसह हजर राहावे, असे मुख्य सचिवाचे निर्देश असल्याबाबतचे पत्र राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी शशिकांत योगे यांनी महापालिकेत पाठविले. मुंबईतून आयुक्तांना दहा दिवसांत दुसऱ्यांदा बोलावण्यात आले आहे. त्यातही पत्रात अतितत्काळ असा शेरा असल्याने महापालिका परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख