Chief minister's Pandharpur tour with both Deshmukh's | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची दोन्ही देशमुखांसोबत पंढरीची वारी 

परशुराम कोकणे 
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सोलापूर विमानतळावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हेलीकॉप्टरने पंढरपूरला जाताना मुख्यमंत्र्यांनी दोन्ही देशमुखांना सोबत घेतले. तसेच त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही होते. 

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सोलापूर विमानतळावर सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हेलीकॉप्टरने पंढरपूरला जाताना मुख्यमंत्र्यांनी दोन्ही देशमुखांना सोबत घेतले. तसेच त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही होते. 

सकाळी साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथून विमानाने सोलापूर विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या सोबत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. स्वागतानंतर हे पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. 

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, महापालिकेचे सभागृह नेता संजय कोळी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, वीरभद्रेश बसवंती, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, पोलिस उपायुक्त शशिकांत महावरकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे आदी उपस्थित होते. 

सोलापूरहून पंढरपूरला हेलिकॉप्टरमधून जाताना मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सोबत होते. दुपारी एक वाजता मुख्यमंत्री सोलापुरात आले. वडार समाजाच्या कार्यक्रमानंतर ते दुपारी विमानाने हैद्राबादकडे रवाना झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख