मुख्यमंत्री साहेब...सरकार तीन चाकी रिक्षाचे आहे हे दाखवून द्या !

आम्ही परमिट, वन टाईम रोड टॅक्स यातून कोट्यावधी रुपये शासनाला कर भरतो आहोत. बँकेच्या कर्जाचा हप्ता भरावाच लागणार आहे. पण सध्या रिक्षाचालक संकटात सापडला आहे.
  मुख्यमंत्री साहेब...सरकार तीन चाकी रिक्षाचे आहे हे दाखवून द्या !

लातूर : माजी मुख्यमंत्र्यांना उद्देशून आमचे सरकार हे गरिबांचे तीन चाकी रिक्षाचे आहे,  मेट्रोवाल्याचे नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला जाहिर केले होते. याची आठवण आता त्यांना त्यांच्याच पक्षाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र  चालक सेनेने करून दिली आहे. 

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे  चालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे वरिल वाक्याची आठवण करून देत दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील परवानाधारक  प्रत्येकी पाच हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी रिक्षासेनेने केली आहे.

राज्यात परवाना बॅच काढलेले सुमारे तीस लाख  आहेत. सर्वांचे हातावरचे पोट आहे. कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रिक्षांची चाकही लॉक झाली आहेत. बाहेर गेले तर कोरोनाची भिती आणि घरात बसले तर उपासमार अशी परिस्थिती  चालकांची झाली आहे. 

अगोदरच खुले परमिट धोरण राबवले जात असल्याने आमचा रोजगार कमी झाला आहे. नवीन परमिटसाठी नवीन रिक्षा ही अट घातली गेली आहे. जुन्या रिक्षांना नवीन परमीट दिले गेले असते तर आम्ही कर्जबाजारी झालो नसतो.

या चुकीच्या धोरणामुळे आम्ही रिक्षा कंपन्या, विमा कंपन्या, बँका, फायनान्स, खासगी सावकार जगवले पण आम्ही मात्र कर्जबाजारी झालो. याची शासन दरबारी दाद फिर्याद. 

रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ धुळखात पडून आहे. फक्त घोषणा झाली, अंमलबजावणी मात्र शुन्य आहे, असे परखड मतही रिक्षाचालक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात मांडले आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांना उद्देशून आपण 'होय हे सरकार गरीब, तीनचाकी रिक्षांचे आहे, मेट्रोवाल्यांचे नाही असे म्हणाला होतात, मग आता कोरोनाच्या महामारीत या रिक्षा चालकांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

 दिल्लीच्या धर्तीवर प्रती रिक्षाचालकास पाच हजार रुपये आपत्कालीन तातडीची मदत द्यावी अशी मागणी रिक्षाचालक सेनेचे राज्याध्यक्ष शिवाजी माने व राज्य सचिव त्र्यंबक स्वामी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com