मुख्यमंत्री जनतेतून निवडल्यास सकाळी शपथ घेण्याची वेळ येणार नाही : हजारे

मुख्यमंत्री जनतेतून निवडल्यास सकाळी शपथ घेण्याची वेळ येणार नाही : हजारे

पुणे : थेट जनतेतून मुख्यमंत्री निवडला तर सकाळी आठ वाजता शपथ घेण्याची वेळ येणार नाही आणि राजकारण्यांना दिवसेंदिवस हॉटेलात रहाण्याची वेळही येणार नाही "असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. 

गावाचा सरपंचच नाही तर राज्याचा मुख्यमंत्रीसुद्धा जनतेतून निवडला जावा.महाविकास आघाडीला सत्तेचे विकेंद्रीकरण आणि आर्थिक पारदर्शकता नको आहे म्हणूनच थेट सरपंच निवड रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."सदस्यातून निवड झाली तर लोकशाही धोक्‍यात येऊ शकते"असही अण्णांचं मत आहे. 

भाजप सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या सदस्यांमधून सरपंच निवडून देण्याची पद्धत बंद केली आणि थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत सुरू केली. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर सरपंचाची थेट निवड ही पद्धत रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार दिला त्यामुळे अंमलबजावणी थांबली आहे. 

हजारे यांनी मात्र महाविकास आघाडीवर टिकेची झोड उठवत थेट सरपंच निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. 'महाविकास आघाडीला सत्तेचे विकेंद्रीकरण आणि आर्थिक पारदर्शकता नको आहे म्हणूनच थेट सरपंच निवड रद्द करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊन गावागावात हुकूमशाही येईल."असे हजारे यांनी म्हटलं आहे.
 
"सरपंच निवडून देण्याचा अधिकार फक्त सदस्यांना नको तर गावातील प्रत्येक मतदाराला हवा. त्यातूनच खरी लोकशाही येऊ शकते. जर केवळ सदस्यांना अधिकार दिले तर ते लोकशाहीला मारक ठरेल. "असं सांगत हजारे यांनी "सरपंचच नाही तर राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतून निवडला जावा. " अशी मागणी त्यांनी केली आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com