Chief minister requests speaker to allow personal assistant in assembly | Sarkarnama

स्वीय सचिवांच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी !

मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज ब्युरो
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई : पावसाळी अधिवेशनात विधीमंडळ प्रवेशावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे या अधिवेशनात इमारतीत येणाऱ्यांची गर्दी ओसरली आहे. उत्तरप्रदेशाच्या विधानसभेत सापडलेल्या स्फोटकांमुळे महाराष्ट्रात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 सभागृहातील सचिव दीर्घेत असतात  , आयएएस  अधिकारी निरूत्साही असल्याने येत नाहीत तर नियंत्रणाच्या या नियमावलीमुळे उपसचिव, स्वीय सचिवांना दीर्घेत प्रवेश मिळत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी सचिव गेलेत कुठे असा प्रश्‍न उपस्थित करत हजर रहाण्याच्या उदासीनतेचा उल्लेख सर्व प्रथम केला. 

तालिका सभापती योगेश सागर यांनी या गैरहजेरीबददल नापसंती व्यक्त केली.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च स्वीय सचिवांच्या मदतीला धावून आले. विधानसभेत हजर झालेल्या फडणवीस यांनी अध्यक्ष हरीभाउ बागडे यांनाच अधिकाऱ्यांबाबत जरा नियम शिथील करण्याची विनंती केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही स्वीय सचिवांना प्रवेश द्या, अशी विनंती केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख