Chief Minister Kamal Nath and (Late) Sanjay Gandhi's friendship remembers in Bhopal | Sarkarnama

मुख्यमंत्री कमलनाथ आणि (कै.) संजय गांधींच्या मैत्रीला भोपाळमध्ये उजाळा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

गेल्या अनेक वर्षांनी कॉंग्रेसच्या होर्डिंगवर संजय गांधी यांची छबी आज भोपाळमध्ये दिसून आली. संजय गांधी यांचे बालपणीचे मित्र कमलनाथ यांनी मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी भोपाळ शहरात अनेक ठिकाणी संजय गांधी यांचे होर्डिंग दिसून आले.

नागपूर : गेल्या अनेक वर्षांनी कॉंग्रेसच्या होर्डिंगवर संजय गांधी यांची छबी आज भोपाळमध्ये दिसून आली. संजय गांधी यांचे बालपणीचे मित्र कमलनाथ यांनी मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी भोपाळ शहरात अनेक ठिकाणी संजय गांधी यांचे होर्डिंग दिसून आले.

कमलनाथ व संजय गांधी हे बालपणीचे मित्र. ते डून स्कूलमध्ये एकत्र शिकले. आणिबाणी व त्यानंतरच्या काळात कमलनाथ यांनी संजय गांधी यांची साथ दिली होती. परंतु 1980 मध्ये विमान अपघातात अचानकपणे मृत्यू झाल्याने संजय गांधी यांचे पर्व तेथेच संपले. काही वर्षांनी संजय गांधी यांचे छायाचित्रही कॉंग्रेसच्या पोस्टरवरून गायब झाले. परंतु अचानकपणे मध्यप्रदेशातील कॉंग्रेस जणांना संजय गांधी यांची आठवण आली. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत संजय गांधी यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग भोपाळच्या मुख्य रस्त्यांवर व शपथग्रहण असलेल्या `जम्हुरी' मैदानावर बाहेर लावल्याचे तेथे उपस्थित असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. 
या होर्डिंगवर संजय गांधी यांचे छायाचित्र झळकल्याने जुन्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनाही आनंद झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला. 

या संदर्भात बोलताना आमदार सुनील केदार म्हणाले, की संजय गांधी यांनी अत्यंत कठीण काळात इंदिरा गांधी यांच्यासोबत कॉंग्रेसचे संघटन मजबूत केले होते. त्यांच्यासोबत कमलनाथ यांचीही साथ होती. त्यांची लहानपणापासून मैत्री होती. संजय गांधी यांच्याबद्दल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आदर असणे यात वाईट काय? संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधी व सुपुत्र वरूण गांधी सध्या दुसऱ्या पक्षात असले तरी त्यांच्याबद्दल आम्हा कार्यकर्त्यांना आदर व प्रेम आहे. ही एक चांगली सुरूवात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख