'होम मिनिस्टरां'च्या गाण्याला चीफ मिनिस्टर फडणवीसांची दाद  - chief minister Devendra Fadanvis enjoys song sung by Amruta Fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

'होम मिनिस्टरां'च्या गाण्याला चीफ मिनिस्टर फडणवीसांची दाद 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई :  मुंबई पोलिसांच्या ‘उमंग २०१८’   कार्यक्रमात सौ . अमृता फडणवीस अमृता फडणवीस यांनी  'जिया जाये ना  जाये ना , जाये ना ,ओ  रे पिया रे ' हे गाणे सादर केले ,आणि 'होम मिनिस्टरां' च्या गाण्याला चीफ मिनिस्टर फडणवीसांची दाद  मिळाली .
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची कन्या दिविजा यांनी या गायनाचा शाहरुख खान आणि इतर कलावंतांसोबत आनंद घेतला . 

मुंबई :  मुंबई पोलिसांच्या ‘उमंग २०१८’   कार्यक्रमात सौ . अमृता फडणवीस अमृता फडणवीस यांनी  'जिया जाये ना  जाये ना , जाये ना ,ओ  रे पिया रे ' हे गाणे सादर केले ,आणि 'होम मिनिस्टरां' च्या गाण्याला चीफ मिनिस्टर फडणवीसांची दाद  मिळाली .
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची कन्या दिविजा यांनी या गायनाचा शाहरुख खान आणि इतर कलावंतांसोबत आनंद घेतला . 

सौ . अमृता फडणवीस यांनी प्रकाश झा यांच्या जय गंगाजल चित्रपटासाठी पार्श्वगायन केलेले होते . जय गंगाजल मध्ये त्यांनी गायिलेले 'सब धन माती ' हे गाणे देखील त्यांनी यावेळी  सादर केले . तसेच हा चित्रपट पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असल्याने हे गीत सादर केल्याचा उल्लेखही त्यांनी केला . 

महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख, रणबीर कपूर, अक्षयकुमार,यांच्या सह बॉलिवूड मधील तारे तारकांच्या मांदियाळीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी  रात्री झालेल्या मुंबई पोलिसांच्या ‘उमंग २०१८’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने बीकेसी च्या मैदानावर पोलीस कुटुंबियांचा आनंद द्विगुणित केला.

मुंबई पोलीस दलाच्या वतीने आयोजित उमंग 2018 कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री.फडणवीस,त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा,

दिग्दर्शक रमेश सिप्पी, जितेंद्र, श्रीदेवी, बोनी कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, अनुष्का शर्मा, जॉनी लिव्हर, अभिनेत्री कंगना राणावत, हेमामालिनी, दीपिका पदुकोण, रोहित शेट्टी, श्रेयस तळपदे यांच्यासह बॉलिवूड मधील तारे, तारका यांनी उपस्थिती लावली होती.

दिग्दर्शक करणं जोहर यांनी अभिनेता अमीर खान याची मुलाखत घेतली. अभिनेता जितेंद्र यांचे आयुक्त श्री.पडसलगीकर यांनी स्वागत केले.

अभिनेत्री आलिया भट, रणवीर सिंग, हास्य अभिनेता सुनील ग्रोव्हर, गायक हिमेश रेशमिया, अनचना सुखानी, मलायका अरोरा, नेहा कक्कर, गायक मिका सिंग यांच्यासह विविध गायकांनी व नृत्य कलावंतांनी हिंदी गीतांवर कला सादर केली.

मुंबई पोलिसांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महानायक अमिताभ बच्चन याच्या हस्ते झाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख