पंतप्रधान मोदींना पाण्यात पाहणाऱ्या चिंदबरम यांना जामीन  - chidambaram bail from supreme court inx media issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पंतप्रधान मोदींना पाण्यात पाहणाऱ्या चिंदबरम यांना जामीन 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारला नेहमीच पाण्यात पाहणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पी. चिंदबरम यांना आयएनएक्‍स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला. तुरूंगात असतानाही त्यांनी भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. 

आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना गेल्या ऑगस्ट महिन्यात सीबीआयने अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे.

 आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. चिंदबरम हे पंतप्रधान मोदींचे कडवे विरोधक आहेत. त्यांच्या अटकेचा कॉंग्रेस तीव्र शब्दात धिक्कार केला होता. कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि ज्येष्ठ नेत्यानीही त्यांची तुरूंगात जावून भेट घेतली होती. चिंदबरम यांना जामीन मिळाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख