पिंपरी पालिका आयुक्तांना राजकीय चिकून गुणियाः मयूर कलाटे

 पिंपरी पालिका आयुक्तांना राजकीय चिकून गुणियाः मयूर कलाटे

पिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाच चिकून गुणियाचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते पालिकेत येत नाहीत. स्थायी समितीच्या बुधवारच्या सभेलाही ते गैरहजर होते. मात्र, हा राजकीय चिकून गुणिया (राजकीय व्हायरल)आयुक्तांना झाला असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आज केला.

डासांमुळे होणारा हा आजार आता थेट आयुक्तांनाच झाल्याने त्यातून शहरातील त्याच्या संसर्गाचा व्याप्ती अधोरेखित झाली आहे.

हर्डीकर यांच्या पत्नीलाही या साथीचा प्रार्दूभाव झाला आहे. डोंबीवली येथे आपल्या घरी गेले असताना त्यांना या आजाराचा संसर्ग झाला. खुद्द आयुक्तांनीच सरकारनामाशी बोलताना त्याला दुजोरा दिला. शहरातही ही व डेंगीची साथ जोरात आहे. शहराची कचराकुंडी झाल्याने डासांचा प्रार्दूभाव होऊन ही साथ पसरली आहे. 

त्यातही शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी व पवना नदीकाठच्या परिसरात डासांचा व पर्यायाने या आजाराचा मोठा प्रार्दूभाव आहे. आता,तर आयुक्तांनाच तो झाला आहे. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्याने आपली केलेली काळे कामे बाहेर येतील. म्हणून आपला निष्क्रियपणा झाकण्यासाठी आयुक्तांना हा राजकीय चिकून गुणिया झाल्याचा हल्लाबोल कलाटे यांनी केला आहे. 

भाजपचे घरगडी, प्रवक्ते असा आरोप विरोधकांनी आयुक्तांवर यापूर्वीच केलेला आहे. त्यात सत्ताबदल झाल्याने त्यांच्या बदलीची मागणी केली गेली आहे. त्यातून ती होण्याची चर्चा सुरु झाली आहे. एवढेच नाही,तर त्यांच्या जागी कार्यक्षम,प्रामाणिक तुकाराम मुंडे यांचे नावही घेतले जात आहे.त्यामुळेच हा राजकीय आजार आयुक्तांचा झाला असल्याचा आरोप कलाटे यांनी केला आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com