छगन भुजबळ रोज करतात दोन हजार लोकांच्या तक्रारींचे निराकरण 

मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मत्री म्हणून छगन भुजबळांकडे माध्यमे, अधिकारी, नागीरकांचा त्यांच्याकडे गराडा असतो. 'लॉकडाऊन' मध्ये प्रमुख जबाबदारी असलेले पुरवठा विभागाचे 'थॅंकलेस' काम ते न थकता पार पाडतात. रोज सामान्यांपासून तर लोकप्रतिनिधी, नेत्यांच्या दोन हजार तक्रारी प्राप्त होतात. त्याचे निराकरण लगेचच करण्यावर त्यांचा भर असतो.
Chagan Bhujbal Solve Two Thousand Complaints Every Day
Chagan Bhujbal Solve Two Thousand Complaints Every Day

नाशिक : 'कोरोना'ने सगळ्यांचाच दिनक्रम व कामकाज अंर्तबाह्य बदलले आहे. राज्य मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री म्हणून छगन भुजबळांकडे माध्यमे, अधिकारी, नागरिकांचा गराडा असतो. 'लॉकडाऊन' मध्ये प्रमुख जबाबदारी असलेल्या पुरवठा विभागाचे 'थॅंकलेस' काम ते न थकता पार पाडतात. रोज सामान्यांपासून तर लोकप्रतिनिधी, नेत्यांच्या दोन हजार तक्रारी प्राप्त होतात. त्याचे निराकरण लगेचच करण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या कामाचे मॅनेजमेंट हा चर्चेचा विषय आहे. 

'कोरोना' संसर्गाने देशभर हाहाकार आहे. त्यात महाराष्ट्राचे काम अतिशय शांतपणे सुरु आहे. त्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडलेल्या, रोजगार गमावलेल्या अन्‌ गरीब नागीरकांना जिवनाश्‍यक वस्तूंचा पुरवठा अत्यंत महत्वाचा आहे. त्यात कितीही काम केले, तरीही स्वस्त धान्य दुकानदारांचे 'पॉलिटीकल' कनेक्‍शन, जडलेल्या वाईट सवयी, राजकीय हस्तक्षेप अन्‌ विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांची टिका यातून मार्ग काढत कामावर लक्ष देणे सोपे नाही. कितीही केले तरी टिका होतेच. केवळ विरोधक नव्हे तर घरातलेही टीका करतातच. त्यामुळे हे 'थॅंकलेस'काम ते 'वर्क फ्रॉम होम'द्वारे यशस्वीपणे करतात. त्यानंतर दौरे होतातच. 

राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना अन्न, धान्य उपलब्ध व्हावे त्यांच्या अडचणींचे निरासन व्हावे यासाठी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असलेल्या त्यांच्या कक्षात सुमारे दोन हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त होतात. यामध्ये त्यांनी स्वतःचा, दोन विशेष कार्यकारी अधिकारी आणि स्वीय सहाय्यकाचा भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केला आहे. त्यावर या तक्रारी प्राप्त होतात. त्यानंतर लगेचच संबंधींता सुचना देऊन त्याचे निराकरण केले जाते. 

मॅनेजमेंटची खास शैली

त्याचा फिडबॅक घेण्यासाठी संबंधीत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला कळविले जाते. अंतिम कारवाई होते. अनेकदा संयमाची परिक्षाही होते. मात्र सर्व काही ते शांतपणे हाताळतात. त्यात त्यांचा अनुभव आणि खास मॅनेजमेंटची शैली त्यांच्या मदतीला येते. 

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर लक्ष असते. यासाठी मंत्री भुजबळ हे अथक प्रयत्न करत आहेत. त्यांची दिनचर्या अधिक व्यग्र बनली आहे. 

सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात

सकाळी लवकर उठून ते कामाला सुरवात करतात. नित्य व्यायामासह सर्व नित्यक्रम पार पडल्यानंतर वर्तमान पत्रे तसेच वाहिन्यांवरील बातम्यांच्या माध्यमातून ते राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतात. 

सकाळी दहा वाजेच्या सुमारास कार्यालयात आल्यानंतर जीवनावश्‍यक वस्तूंबाबत आढावा घेऊन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनी द्वारे चर्चा केली जाते. त्यांना विविध सूचना दिल्या जातात. त्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत दैनंदिन आढावा घेत असलेल्या अडचणींची तत्काळ सोडवणूक करतात. कार्यालयात आलेल्या माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करतात. तसेच व्हिडीओ कॉल द्वारे विविध माध्यमांना मुलाखती देतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात. परिस्थिती अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळण्यासाठी त्यांचे काटेकोरपणे नियोजन सुरू आहे. माध्यमांद्वारे नागरिकांना आवाहन करत सरकार च्या वतीने परिस्थितीवर नियंत्रण करतांना दिसत आहेत. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा रात्री उशिरा त्यांचा दिवस संपतो आणि ते निवासस्थानी निघतात. अतिशय व्यस्त कार्यक्रमातून त्यांचा दिनक्रम पूर्ण होतो. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com