छगन भुजबळांमुळे गिरीष महाजनांच्या गढीला धक्का?

यदाकदाचित छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत दाखल झाले तर नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होऊ शकतात .
Mahajan-Bhujbal
Mahajan-Bhujbal

नाशिक :  छगन भुजबळ राष्टवादी काँग्रेस मधून शिवसेनेत जाणार का याविषयी वारंवार चर्चा होतेय. छगन भुजबळ मात्र मी आहे तेथे बरा आहे, देवालाच याबाबत ठाऊक अशी प्रतिक्रिया देत आहेत . असे आले तरी जर यदाकदाचित छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत दाखल झाले तर नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे परिणाम होऊ शकतात .  

सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे . पण छगन भुजबळ जर शिवसेनेत दाखल झाले तर गिरीश महाजनांची गढी ते हादरवून सोडू शकतात हे नक्की ! खरे पहाता नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा पूर्वी बालेकिल्ला होता . पण शिवसेना मनसे संघर्षात भाजपने जिल्ह्यात केंव्हा मुसंडी मारली हे शिवसेनेला कळले नाही . 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांविषयी नाशिकपुरता मर्यादित नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातही शिवसेनेची ताकद वाढणार आहे. येथील राजकारणावर सध्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची चलती आहे. श्री. भुजबळ यांच्यासारखा मातब्बर नेता शिवसेनेला मिळाल्यास उत्तर महाराष्ट्रातही शिवसेनेला ऊर्जा मिळेल. गिरीष महाजन यांच्या एकहाती कारभाराला धोका पोचेल, अशी  भीती भाजप पदाधिकाऱ्यांना वाटते आहे. 

आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होईल की नाही, कोणाला उमेदवारी मिळेल, भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता येईल की नाही, अशा राजकीय प्रश्‍नांवर सध्या सर्वत्र चर्वितचर्वण सुरू असताना नाशिक भाजपमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ शिवसेनेत गेल्यावर काय होईल, याच प्रश्‍नाभोवती राजकारण फिरताना दिसत आहे. 

काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अर्थात, स्वत: भुजबळ यांनी या संदर्भात सर्व शक्‍यता फेटाळून लावल्या असल्या तरी भाजप, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यावरून निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी प्रवेश होईलच, अशी पक्की खात्री भाजपच्या नेत्यांना झाली आहे. 

त्यामुळे भुजबळ शिवसेनेत गेल्यास जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल व शिवसेनेची ताकद रोखण्यासाठी काय करता येईल, याचेच आडाखे बांधण्यात नेतेगण गुंतल्याचे दिसून येत आहे. राजकीय दृष्टीने विचार केल्यास शहर व जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद आहे. महापालिका व पालिकांवर तसेच चार आमदार, एक खासदार तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत आहे. जर भुजबळ शिवसेनेत गेल्यास त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व काही आमदारसुद्धा शिवसेनेत येतील. 

त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन हेच हेवीवेट नेते आहेत. श्री. भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास पालकमंत्र्यांचा दबदबा कमी होण्याची भीती भाजप नेत्यांना सतावत आहे.

नाशिकसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्‍न शासनदरबारी सोडविण्यासाठी नेतृत्व नाही. त्यामुळे श्री. भुजबळ शिवसेनेत गेल्यास नाशिकचे गाऱ्हाणे शासनदरबारी मांडण्यासाठी हक्काचा माणूस मिळणार असल्याची भावना नाशिककरांमध्ये निर्माण झाल्याची जाणीव भाजप नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com