chetan tupe selects new team for pune ncp | Sarkarnama

चेतन तुपेंच्या टीममध्ये नवे चेहरे; प्रत्येक मतदारसंघात अध्यक्षाच्या जोडीला कार्याध्यक्ष

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे : सत्ताधारी भरतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक होऊन आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात नवी फौज उभारली आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची भक्कम बांधणी व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी या मतदारसंघांसाठी अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षही नेमले आहेत.

पुणे : सत्ताधारी भरतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक होऊन आपले राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात नवी फौज उभारली आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची भक्कम बांधणी व्हावी म्हणून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी या मतदारसंघांसाठी अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षही नेमले आहेत.

या कार्यकारिणीत काही तरुण चेहऱ्यांना सामावून घेत, जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे. विशेष करून महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास असलेल्या कार्यकर्त्यांना पद दिले आहे. कार्याध्यक्षांच्या नेमणुकांमुळे शहराध्यक्ष चेतन तुपेंच्या दिमतीलाही कार्याध्यक्ष राहणार का ? याची चर्चा आहे. 

सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोठात आगामी निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सावरण्याचा नेत्यांचा आहे. या पार्श्‍वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी तुपेंनी आपली नवी टीम जाहीर केली असून, तित, तीन शहर उपाध्यक्षांसह, आठ मतदारसंघांचे अध्यक्ष, कार्याध्यांच्या नावांची घोषणा केली. तेव्हाच, सामाजिक न्याय आणि "ओबीसी'सेलचे अध्यक्षही निवडले आहेत.

शहर उपाध्यक्षपदावर नारायण गलांडे, शशिकांत तापकीर, आनंद तांबे यांना संधी मिळाली आहे. तर, पर्वती मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नितीन कदम आणि कार्याध्यक्ष म्हणून दिलीप कांबळे यांच्याकडे देण्यात आली आहे. कसब्यासाठी विनायक हणमघर, गणेश नलावडे, तर कोथरुडमध्ये स्वप्नील दुधाणे, नितीन कळमकर यांना संधी दिली आहे. शिवाजीनगरची जबाबदारी माजी नगरसेवक निलेश नीकम, राजेश सानेंकडे दिली आहे.

हडपसर मतरसंघाच्या अध्यक्षपदी नारायण लोणकर आणि कार्याध्यक्ष म्हणून आबा कापरे यांना निवड झाली आहे. खडकवासल्यात माजी नगरसेवक काका चव्हाण आणि संतोष फरांदे यांना संधी मिळाली आहे. वडगावशेरीच्या अध्यक्ष राजेंद्र खांदवे-पाटील, कार्याध्यक्षपदी रमेश आढाव यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघातून भोलासिंग अरोरा आणि कार्याध्यक्ष म्हणून फहिम शेख यांच्या नावांची घोषणा झाली आहे. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्षपद विजय डाकले तर, "ओबीस' विभागाची जबाबदारी संतोष नांगरेंकडे दिली आहे.

नवी कार्यकारिणी जाहीर करताना संघटनेच्या कामाचा अनुभव, शहराच्या प्रश्‍नांची जाण यांना प्राधान्य दिल्याचे तुपे यांनी सांगितले. केवळ पदे घेऊन मिरविणाऱ्यांना मात्र, कार्यकारिणीपासून लांब ठेवल्याचे दिसून आले. तुपे म्हणाले, ""पुढील निवडणुका जिंकण्यासाठी अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. ज्याचा फायदा लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी होईल. तरुण मतदारांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न असून, त्याकरिता काही जणांना संधी दिली आहे.'' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख