पुण्यात फुगलेल्या निविदांचा घोटाळा चेतन तुपेंनी विधानसभेत पोहोचवला

पुणे शहराच्या विकासासाठी आखलेल्या मात्र साडेचार हजार कोटींनी फुगविलेल्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या निविदांचे प्रकरण विधीमंडळाच्या अधिवेशनातही शुक्रवारी चांगलेच गाजले.
chetan-tupe
chetan-tupe

पुणे : पुणे शहराच्या विकासासाठी आखलेल्या मात्र साडेचार हजार कोटींनी फुगविलेल्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या निविदांचे प्रकरण विधीमंडळाच्या अधिवेशनातही शुक्रवारी चांगलेच गाजले. चढ्या दराच्या निविदांवर पुणेकरांनी आवाज उठताच काढलेल्या फेरनिविदांची चौकशी करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी या प्रकरणाकडे विधीमंडळाचे लक्ष वेधले. त्यामुळे पुण्यातील फेरनिविदांमधील गैरव्यवहार प्रकरण गंभीर झाले आहे.

शहरातील लोकांना शुध्द पाणी पुरवठा करणारी समान पाणीपुरवठा योजना, शहरातर्गंत उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर), नदीसुधार योजना, कात्रज-कोंढवा रस्त्यासह जलपर्णी आदी कामांसाठी काढलेल्या निविदा पहिल्या एक-दोन टप्प्यात रद्द झाल्या. मुळातच, या निविदांचे पूर्वगणकपत्र (इस्टिमेट) फुगल्यानेच त्या रद्द करण्यात आल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यामुळे पुणेकरांचे तब्बल साडेचार हजार कोटी रुपये वाचल्याचे उघड झाले. 


याकडे लक्ष वेधत, या प्रकरणांची चौकशी करण्याच्या हालचाली राज्य सरकार करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने नुकतेच प्रसिध्द केले. एवढ्या प्रमाणातील गैरव्यहाराच्या निविदांचे प्रकरण उघड झाल्याने सर्वच स्तरातून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. तसेच, त्याची चौकशी करून दोषींविरोधात कारवाईची मागणीही करण्यात येत आहे.

पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते अजित पवार यांनी गैरव्यवहारांचा मुद्दा उपस्थितीत केला.यासंदर्भात सरकार गांभीर्याने लक्ष घालणार असल्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीसह कॉंग्रेस आणि शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरून भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून तुपे यांनी विधीमंडळात हा मुद्दा मांडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष वेधले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com