Cheating case filed against Nagpur BJP president Kohale | Sarkarnama

आमदार कोहळेंवर फसवणुकीचा गुन्हा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागत असताना या गुन्ह्यामुळे कोहळेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

नागपूर : नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पक्षांतर्गत असंतोषाचा सामना करावा लागत असताना या गुन्ह्यामुळे कोहळेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

नागपूर महापालिकेतील भाजपच्या उमेदवारांची निवड करताना कोहळेंच्या कार्यशैलीवर बरीच टीका झाली होती. अनेक असंतुष्टांनी थेट नितीन गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने केली होती. या असंतोषासाठी कोहळे कारणीभूत असल्याचे अनेक महिलांनीही आरोप केले होते. निवडणूक निकालानंतर ही नाराजी कमी होत असताना कोहळेंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या नेत्यांची अडचण झाली आहे. 

नागपूर शहरात एका भूखंडाच्या खरेदीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी जानकीनगरात 2200 चौरस फुटाचा भूखंड खरेदी केला. बयाणापत्रातही याचा उल्लेख आहे. परंतु विक्री करताना भूखंड 3200 चौरस फूट असल्याचे नमूद करण्यात आले. या विरोधात आरटीआय कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केली. त्यानंतर या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आमदार कोहळे यांच्याविरोधातही हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख