chavan send a letter to soniya gandhi | Sarkarnama

अशोक चव्हाणांनी न लिहिलेल्या पत्राने खळबळ!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली : देशात कॉंग्रेस सगळीकडेच अडचणीत असताना आता महाराष्ट्रातही कॉंग्रेस पक्षात नव्याने समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दिल्लीच्या पराभवानंतर जसे नेत्यामध्ये ट्‌विटर वॉर सुरू झाले तसे आता महाराष्ट्रात सुरू होणार की काय अशी शक्‍यता व्यक्त होत होती.

माजी मुख्यमंत्री व एकेकाळचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवून प्रदेशाध्यक्षपदावरून बाळासाहेब थोरात यांना हटवावे अशी मागणी केल्याचे वृृत्त पसरले आणि खळबळ उडाली. विशेष म्हणजे  आपल्याला या पदाची जबाबदारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केल्याचे या वृत्तात म्हटले होते. अशोक चव्हाणांनी आपण असे पत्रच लिहिले नसल्याचा नंतर दावा केला. 

एबीपी न्यूज या हिंदी वाहिनीने ही बातमी दिली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाची जी वाईट कामगिरी झाली त्याला पूर्णपणे बाळासाहेब थोरात हेच जबाबदार आहेत त्यांना या पदावरून हटवावे, अशी मागणी या कथित पत्रात केली होती. थोरात सध्या राज्य मंत्रिमंडळात महसूलमंत्री आहेत. कॉंंग्रेसमध्ये राज्याच्या अध्यक्षपदी नवी व्यक्ती निवडली जाणार आहे, त्यातच हे पत्र कॉंंग्रेस श्रेष्ठींकडे गेल्याची चर्चा सुरू झाली. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी खासदार राजीव सातवही आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव या पदासाठी घेतले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख