साठीपार खासदार चव्हाणांनी 100 दिवसात घटवले 11 किलो वजन ...

दिंडोरीचे भाजप खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी शंभर दिवसात किलो वजन कमी केले आहे . आहारावर थोडे नियंत्रण आणि दररोज सायकल चालविण्याचा व्यायाम करून त्यांनी वजनावर नियंत्रण मिळवून दाखवले आहे.मात्र त्यांचे राजकीय वर्तुळातील वजन घटलेले नाही. राजकारणातील त्यांचे वजन आणि दबदबा वाढतोच आहे .
 साठीपार खासदार चव्हाणांनी 100 दिवसात घटवले 11 किलो वजन ...

वयाच्या सहासष्टीत प्रवेश केलेला. मात्र आठ वर्षापूर्वी एक अपघात झाला आणि वर्षभर दुखणं मागं लागलं. एक वर्ष चालताही येत नव्हते . त्यानंतर तब्ब्येत सुधारली पण पूर्वीचा फिटनेस राहिला 
नव्हता . सारं आयुष्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांना भेटण्यात गेलेलं. दिवसभर धावपळ . 

कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि दौरे , बैठका . गेल्या वर्षभरात थकवा जाणवायला लागला होता . एकेदिवशी त्यांनी ठरवले वजन घाटवायचे आणि पुन्हा जनसेवेसाठी अधिक सज्ज व्हायचे . त्यांचे चिरंजीव समीर यांनी वडिलांसाठी इनडोअर सायकल आणली . त्यावर खासदारांनी व्यायाम सुरू केला. 

दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी एखाद्या तरुणाला लाजवेल अशी किमया केली आहे. साठीनंतर खरंतर शरीराची कार्यक्षमता कमी होते व्यायामाचा उत्साह कमी होतो पण चव्हाण यांनी आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करून तरुणासमोर वेगळाच आदर्श निर्माण केला. 

त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, "सुरवातीला खरंतर मला सायकलिंगच्या व्यायामाचा कंटाळा यायला लागला होता. पण नंतर मी निर्धारानं तो करत राहिलो मग मला त्या व्यायामानं फ्रेश वाटू लागल्यावर दररोज चाळीस मिनिटे सायकलिंग करू लागलो. चाळीस मिनिटाच्या सायकलिंगमुळे 600 ते 700 कॅलरीज कमी होतात. तसेच या शारीरीक परिश्रमामुळे स्टॅमीना वाढतो. आऊटडोअर सायकलिंगमुळे ते शक्‍य होत नाही. 
त्याचबरोबर मी आहारात वीस ते पंचवीस टक्के कपात केली. शक्‍यतो जेवणाच्या वेळा पाळू लागलो, त्याचा खुप फायदा झाला आहारात एक पोळी कमी केली. मला मांसाहार मनापासून आवडतो. त्यात मात्र तडजोड केली नाही. 

पण मग मी वेळच्या वेळी जेवायला लागलो. कसोशीनं जेवायच्या वेळा पाळायला लागलो. गेले चार महिने व्यायाम आणि जेवणाच्या वेळा चुकवलेल्या नाहीत, शंभर दिवसातच 11 किलो वजन घटलं आता ते पुन्हा वाढणार नाही या काळजीतून व्यायाम व आहार नियंत्रणाचा नियम मोडत नाही.' 

" या सगळ्या बाबींमुळे वजन कमी झाल्याचा अनुभव घेतो आहे. कधी कधी काही मित्र या व्यायामामुळे दुसरा काही धोका नाही ना? अशी शंका उपस्थित करतात. मी मात्र मी निर्धास्तपणे सायकलिंग करतो आहे. त्यामुळे माझा उत्साह वाढतोय.' 

25 डिसेंबर 1951 मध्ये जन्म घेतलेल्या चव्हाण यांचे आवडते खेळ आहेत कब्बडी आणि व्हॉलिबॉल. तरुणपणी कवी असलेल्या चव्हाण यांना खरंतर कसलंच औषध कधी घ्यावं लागलं नाही की कधी कसलं पथ्य पाळावं लागलं नाही. लहानपणापासून दहा -बारा मैल चालणे हे रोजची बाब. त्यामुळे व्यायामाची कधी गरज पडली नव्हती. आहार देखील, जो समोर येईल ते आनंदाने घ्यायचा. 

दिवसातला बराच वेळ कार्यकर्त्यांसमवेत त्यांचा जायचा. 2008 मध्ये त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी नाशिकहून निफाडला जात असताना अफघात झाला त्यात त्यांच्या मणक्‍याला मार बसला आणि मांडीचे हाड मोडले. एक वर्ष त्यांना बिछान्यावरून हलता येत नव्हतं, त्या काळात त्यांची दोन ऑपरेशन झाली. 

इतकचं नाही तर संसदेत जुलै मध्ये विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी भाजपचे दोन खासदार स्ट्रेचरवरून आले त्यातले एक होते भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे हरिश्‍चंद्र चव्हाण. 

पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या चव्हाणांच्या दिनक्रमात कार्यकर्त्यांना भेटणे आणि दौरे याला महत्वाचं स्थान आहे. ते म्हणतात, "मतदारसंघात लोकाच्या कामासाठी सतत सक्रीय रहायचे, अगदी लहान सहान कार्यक्रमाला उपस्थित राहायचे, तसेच मतदार, कार्यकर्ता सगळ्यांना आवर्जून भेटतो. सगळ्याच्या सुख दुःखात हजरराहातो. ती माझी राजकीय उर्जा आहे. त्यासाठी फिटनेस हवा. त्यामुळे आहार नियंत्रण आणि सायकलिंगचा व्यायाम मी कधीही चुकवत नाही. 

कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्‍यातील दुर्गम भागातील राक्षसभूवन या गावचे चव्हाण रहिवासी आहेत. कम्युनिस्ट नेत्यांशी अक्षरशः दोन हात करून ते सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व सभापती झाले . त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्याने 1995 मध्ये माकपचा पराभव करून अपक्ष आमदार झाले. 

या सबंध राजकीय प्रवासात शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून ते राहीले. आजही ते श्री . पवार यांचे मार्गदर्शन घेतात. राजकारणात मात्र भाजपशी एकनिष्ठ राहून काम करतात. आजही ते मतदारसंघात व नागरीकांची कामे करताना पक्षभेद करीत नाही. प्रत्येक सोमवारी त्यांच्याकडे जिल्हा भरातून लोक अडचणी घेऊन येतात. एव्हढी गर्दी होते की घरात जागा रहात नाही. 

.................................................. 
खासदार चव्हाण यांची दिनचर्या.... 
सकाळी 6 ला 40 मिनीटे घरात सायकलिंग, 
सातला दूरचित्रवाणी बातम्या ऐकणे 
आठला एक तास वर्तमानपत्रांचे वाचन 
सकाळी 9 पासून नागरिकांच्या भेटीगाठी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com