chavan and nahsik | Sarkarnama

यंदाच्या निवडणुकीत भाजपला घरी बसवणार - पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नाशिक : भाजपने घोषणांपलिकडे फारसे काहीही केलेले नाही. त्यामुळे जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. राज्याला त्यातून वाचविण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत भाजपला घरी बसवुच. हा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा पक्का निर्धार आहे. असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या कन्येच्या विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी ते येथे आले होते. 

यावेळी ते म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांसाठी आम्ही काम करीत आहोत. त्यासाठी विविध स्तरावर काम सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाची आघाडी होणार आणि निवडणुकीत भाजपला आम्ही घरी बसविणार. महाराष्ट्रात प्रशासकीय स्तरावर खुप समस्या आहेत. सरकारलाच त्यांच्या कामाचे आकलन होत नाही. मंत्री घोषणा करतात मात्र लोकांचे प्रश्‍न सुटले की नाहीत, त्यांच्या अडचणी काय आहेत. त्याबाबत त्यांच्याकडे अजिबात गांभीर्य नाही. त्यामुळे येत्या निवडणुकांत मतदारच योग्य निर्णय घेतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख