...तर डिसेंबरअखेर मोदींना पायउतार व्हावे लागेल : पृथ्वीराज चव्हाण

...तर डिसेंबरअखेर मोदींना पायउतार व्हावे लागेल : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : देशाच्या इतिहासात राफेल खरेदीचा पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. हा खरेदी व्यवहार पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या अखत्यारीत व कोणालाही विश्वासात न घेता केला आहे. येत्या काही दिवसात यातील वस्तुस्थिती समोर येईल. या प्रकरणी सीबीआय आणि न्यायपालिका ठाम राहिल्यास पंतप्रधान मोदींना डिसेंबरअखेर पायउतार व्हावे लागेल, असे भाकित कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. कॉंग्रेसच्या संवाद या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी संयोजक व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, प्रदेश कॉंग्रेसच्या सह प्रभारी सोनल पटेल, पत्रकार मधुकर भावे, शिबिराचे समन्वयक रामहरी रुपनवर, सरचिटणीस यशवंत हप्पे उपस्थित होते. श्री. चव्हाण म्हणाले, देशात जातीभेदाचे विष पसरवले जात आहे. मागील निवडणुकीत मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवले, आश्वासने दिली. यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत जनता त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही. याची कल्पना आल्याने त्यांनी राम मंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक धुर्वीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जातीय दंगली घडण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. 

राफेल खरेदीच्या कराराबद्दल बोलताना ते म्हणाले, इतिहासात पहिल्यांदाचा मोठा घोटाळा झाला आहे. विमानाच्या खरेदी व्यवहाराची माहिती मोदी सरकार देत नाही. या प्रकरणात सीबीआयकडे तक्रार झाल्यानंतर सीबीआयला आठ दिवसात गुन्हे नोंदवावे लागतात. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकणात गुन्हा दाखल करायची शक्‍यता वाटू लागल्यानंतर मोदी सरकराने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची रात्रीत तडकाफडकी बदली केली. निरव मोदी, चोक्‍सी बॅंकाना गंडे घालुन पळुन गेले आहेत. हीच मंडळी पळून जाण्याअगोदर पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या संपर्कात होती, याचे पुरावेही समोर आले आहेत. 2019 ला मोदी सरकार सत्तेवर आले तर लोकशाही संपुष्टात येऊन राज्य घटनाच बदलली जाईल. मोदी यांना गुजरात मॉडेलमधील वन मॅन शो हा हुकुमशाही कारभार देशभर करावयाचा आहे. जनतेने त्यापासून सावध रहावे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com