chavan and khaire | Sarkarnama

औरंगाबादची जागा कुणालाही सुटो, खैरेंचा पराभव अटळ - सतीश चव्हाण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

औरंगाबाद : लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटो की कॉंग्रेस लढो यावेळी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. लोकांना आता विकास हवा आहे, जाती-पातीच्या नावावर केले जाणारे राजकारण आता जनता खपवून घेणार नाही. 

औरंगाबाद : लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटो की कॉंग्रेस लढो यावेळी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. लोकांना आता विकास हवा आहे, जाती-पातीच्या नावावर केले जाणारे राजकारण आता जनता खपवून घेणार नाही. 

सतीश चव्हाण यांनी नुकतीच जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यांची जाहीर सभा आमखास मैदानावर घेतली होती. आता एका सत्कार समारंभाच्या निमित्ताने विचारवंत, काही काळ आम आदमी पक्षात कार्यरत असलेले आणि आता स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांना देखील बोलावण्यात आले आहे. सतीश चव्हाण यांच्या या कार्यक्रमांकडे लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून बघितले जाते. या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना चव्हाण म्हणाले, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे निवडून येतात. पण त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा किती विकास झाला? हा संशोधनाचा विषय आहे. कॉंग्रेस सातत्याने इथून पराभूत होत असल्यामुळे यावेळी ही जागा राष्ट्रवादीला सुटावी असे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. 

अद्याप या बाबत अंतिम निर्णय झालेला नाही. हे जरी खरे असले तरी नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणूका, त्यात सत्ताधाऱ्यांचा दारूण झालेला पराभव पाहता औरंगाबादमध्ये 2019 मध्ये बदल घडणार. जागा राष्ट्रवादीला सुटू द्या, नाहीतर कॉंग्रेसला लढू द्या, यावेळी खैरेंचा पराभव अटळ आहे. 

सेना-भाजप-एमआयएम एकाच नाण्याच्या बाजू 
वंचित आघाडी तुमच्या सोबत येईल का? या प्रश्‍नावर सतीश चव्हाण म्हणाले, एमआयएम वगळून प्रकाश आंबेडकर आघाडीत आले तर त्यांचे स्वागतच आहे. एमआयएमला आम्ही कदापी सोबत घेणार नाही. शिवसेना-भाजप आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील झाल्यास आम्हाला आनंदच आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख