कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून क्रांतीकारी कार्यक्रम : पृथ्वीराज चव्हाण

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातून क्रांतीकारी कार्यक्रम : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : मागील लोकसभा निवडणुकीत मोदींनी भली मोठी आश्वासने दिली. ती पूर्ण करता आली नाही. ते झाकण्यासाठी पाच वर्षात त्यांनी केवळ जुमलेबाजी केली. पण या निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जो जाहीरनामा केला आहे. त्यामध्ये गरिबी निर्मूलन, शिक्षणाचे सक्षमीकरण, रोजगार निर्मिती यासह क्रांतिकारी कार्यक्रम आखला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना साथ द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

सातारा लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील घोणशी, वहागाव, वनवासमाची, खोडशी, गोटे, मुंढे, वारुंजी येथील मतदारांशी आमदार चव्हाण व खासदार भोसले यांचा संयुक्त संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता मोदींच्या आश्वासनांना बळी पडली. मोदी सरकारने शेतीमालाला हमीभावही दिला नाही. कृषी उत्पन्नात दरवर्षी केवळ 2 टक्‍क्‍यांनी वाढ केली. परंतु कॉंग्रेस सरकारच्या काळात दरवर्षी 19 टक्के वाढ झाली. 

शेतीमालाचे आयात-निर्यात धोरण कॉंग्रेसने राबवले. भाजप सरकारने सुशिक्षित बेरोजगार युवकांपुढे अंधकारमय वातावरण केले आहे. खासदार भोसले म्हणाले, मोदींनी मन की बात मधून जनतेविषयी कळवळा आणला. त्यातून लोकांची दिशाभूल केली. गेल्या पाच वर्षात गुऱ्हाळाच्या घाण्यात घालून लोकांची चोथ्यासारखी अवस्था केली आहे. संसदेत बहुमताच्या जोरावर केवळ केंद्रीकरणाची प्रक्रिया राबवली. यावेळी आमदार आनंदराव पाटील, जयंत पाटील, कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, अजित पाटील-चिखलीकर, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील, इंद्रजीत चव्हाण, शिवराज मोरे, कराड दक्षिण महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या थोरवडे, अविनाश नलवडे, झाकीर पठाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com